मंडळाच्या तरुण सदस्यांनो,
नमस्कार !
तुम्हाला माहित असेलच की मंडळाची मराठी शाळा गेले ३ वर्ष ५ ते १२ वयाच्या मुलांसाठी अविरत कार्यरत आहे. त्यासोबत मोठ्या मुलांसाठी काहीतरी सुरु करावे असे मराठी शाळा सुरु केल्यापासून डोक्यात होते. तो विचार आता आम्ही मराठी वाचन क्लब या स्वरूपात पुढे नेऊ इच्छितो.
या वाचन क्लब मध्ये कोणीतरी मोठे तुम्हाला एखादे छान मराठी साहित्य वाचून दाखवतील. तुम्ही त्यांच्याबरोबर वाचू शकता किंवा ऐकू शकता. त्या साहित्यकाराबद्दल, त्यातील साहित्यिक गुणांबद्दल, त्यातील भाषेच्या सौन्दर्याबद्दल, त्या साहित्यावरील तुमच्या मतांबद्दल नंतर चर्चा होईल. तुम्हाला एखादे साहित्य वाचायचे असेल तर तुम्ही आणू शकता.
हा प्रकल्प नि:शुल्क असेल. वय वर्षे १२ ते १९ या गटातील मंडळाच्या कोणत्याही तरुण सभासदाला त्यात भाग घेता येईल. दर दुसऱ्या रविवारी एका नवीन ठिकाणी हे वाचन होईल.
कशी वाटते ही कल्पना? आवडेल तुम्हाला यायला? जर हो असेल तर +६५-९२९५७००० वर मेसेज पाठवा किंवा yuva.readers@mmsingapore.org वर मेल करा.
भेटू या तर मग. लवकरच. काही धमाल मराठी गोष्टी सांगायला आणि वाचायला.