• Home
  • MMS Ganeshotsav 2017 - VividhaGunadarshan : Inviting Entries

MMS Ganeshotsav 2017 - VividhaGunadarshan : Inviting Entries

  • 26 Aug 2017
  • 16:30 - 19:30
  • Global Indian International School, Queenstown Campus

Registration

  • Please register the team leader first - a performing member or non-performing lead. Team leader will be the point of contact for your group.

    Then click "ADD GUEST" and add each performing member one by one. The guest details have to be the performing person's details. If it is a child below 12, please mention the child's name but email address and phone number should be that of the Member Parent. The email address will be used to verify the membership of the performing child/parent.

Registration is closed

नमस्कार मंडळी,

विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही फार दूर नाही. मंडळामध्ये आपण सगळे गणेशोत्सव दरवर्षी खूप उत्साहाने साजरा करतो. ह्या वर्षी गणेशोत्सव शुक्रवार २५ ऑगस्ट २०१७ ते मंगळवार २९ ऑगस्ट २०१७ ह्या दरम्यान होणार आहे आणि आपला आवडता 'विविध गुणदर्शन' हा कार्यक्रम सादर होणार आहे शनिवार २६ ऑगस्ट २०१७ ह्या दिवशी. या वर्षी आपली विविध गुणदर्शन कार्यक्रमाची संकल्पना आहे ‘नवरस’ !

मंडळी, आपले आयुष्य म्हणजे जणू विविधरंगी इंद्रधनुष्यच. श्रृंगार, वीर, करुण, अद्‌भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत अशी जीवनाची सतत बदलणारी विविध रूपे. जीवनातील हेच नवरस आणि त्यांची रूपे आपल्याला यावेळी नृत्य/नाट्य/गानकौशल्यातून सादर करायची आहेत. जशी शृंगार रसावर छानशी लावणी, वीररसावर आवेशपूर्ण पोवाडा, रौद्ररसावर तांडव नृत्य...अशी नवरसांची विविध रुपे आपण सादर करू शकतो. मग लागताय ना तयारीला? आपल्या कल्पकतेला दाद देण्यास आम्ही देखील खूप उत्सुक आहोत.

विविध गुणदर्शनासंबंधी अधिक माहिती अशी आहे:

  • विविध गुणदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी गटप्रमुखाने आपले नाव १६ जुलै २०१७ पर्यंत नोंदवावे. तसेच "ADD GUEST" बटण दाबून गटातील सर्वांची नावे नोंदवावीत.
  • तुम्ही निवडलेला कार्यक्रम हा 'नवरस' संकल्पनेवर आधारित असावा. निवडलेली गाणी मराठी असावीत. 
  • या वर्षी ८ वर्षाच्या वरील मुलांचा गायन कार्यक्रम स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • नाव नोंदवताना ज्या गाण्यांवर तुमचे नृत्य असेल त्या सर्व गाण्यांबद्दल आम्हाला माहीती द्या. वसेच कार्यक्रम प्रकार नृत्य नसेल तर काय सादर कराल त्याची संक्षिप्त माहिती आम्हाला द्या.
  • नोंदवलेल्या गाण्यांच्या व नृत्यप्रकाराच्या पेक्षा वेगळे काही सादर करू नये. सर्व सहभागी गटांच्या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी हे गरजेचे आहे.
  • प्रत्येक प्रवेशिका सामूहिक असावी. स्वतंत्र प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत.
  • प्रत्येक गटाला व्यासपीठावर ५ मिनिटे दिली जातील.
  • एका व्यक्तीने कुठल्याही एकाच सामूहिक कार्यक्रमात भाग घ्यावा.
  • विविध गुणदर्शनाच्या ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे.
  • १२ वर्षांखालील मुलांना सहभागी व्हायचे असल्यास त्यांच्या किमान एका पालकाचे असणे आवश्यक आहे.
  • १२ वर्षांवरील मुलांना सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वत:चे सभासदत्व असणे आवश्यक आहे.
  • सभासदत्वाचे नूतनीकरण केले नसल्यास ते लवकरात लवकर करावे. ३० जून नंतर नूतनीकरण करणे शक्य होणार नाही व नवीन सभासदत्व घ्यावे लागेल. भाग घेणा-या प्रत्येकाचे सभासदत्व असणे गरजेचे आहे.
  • निवडचाचणी व्हिडिओ द्वारा घेतली जाईल. त्यासाठी तुमच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आम्हाला २९ जुलै २०१७ पर्यंत पाठवणे अपेक्षित आहे. त्याबद्दल अधिक माहिती नावनोंदणी केलेल्या गटांच्या प्रमुखास ८ जुलै २०१७ नंतर कळवण्यात येईल.

काही प्रश्न वा शंका असल्यास feedback@mmsingapore.org ह्यावर इमेल पाठवा अथवा श्यामल भाटे यांना ९१४५३५५१ वर वा प्राजक्ती मार्कंडेय यांना ९८२८२३४५ वर संपर्क करा.

आपली कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर

Powered by Wild Apricot Membership Software