• Home
 • MMS Marathi Shala - Admissions (2019)

MMS Marathi Shala - Admissions (2019)

 • 01 May 2019
 • 14:00
 • 30 Apr 2020
 • 16:00
 • S P Jain School of Global Management, 10 Hyderabad Road, Singapore 119579

Registration

 • - For kids under 12 years of age, at least one parent needs to be MMS Member
  - Kids of age 12 and above need their own MMS Membership

Registration is closed


नमस्कार पालक हो,

सिंगापूरमधे आपल्या छोट्या बालमित्रांसाठी मराठी शाळा असावी असे मंडळाचे एक जुने स्वप्न आणि पालकांची मागणी होती. त्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न मंडळाने मागील 2 वर्षी यशस्वीरीत्या केला. या उपक्रमाला पालकांचा, शिक्षकांचा, आणि स्वयंसेवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होतो आहे की मे २०१९ पासून मराठी शाळेचे तिसरे वर्ष नव्या जोमाने सुरु होत आहे. शिक्षक व स्वयंसेवक यावर्षी पुन्हा सुरु होणाऱ्या शाळेच्या तयारीला लागलेले आहेत.

'हसत खेळत मराठी' चे धोरण असे आहे:

 • शाळेत मराठी वाचणे, बोलणे शिकवले जाईल. 
 • मराठी संस्कृती, सण आणि उत्सव याची माहिती करून देणे ह्यावरही भर असेल. गोष्टी, गाणी, खेळ आणि मुलांना आवडतील असे प्रकल्प अशा माध्यमांमधून मुलांना मराठी शिकवले जाईल.
 • प्रवेश घेतला की पूर्ण फी लागू होईल. व प्रवेश घेतल्या दिवसापासून वर्षभर या प्रवेशाची मुदत राहील. 
नावनोंदणीसाठी माहिती खालील प्रमाणे:

शाळेची वेळ: दर शनिवारी दुपारी २ ते ४
वयोगट: ६ ते १३
स्थळ: SP Jain School of Global Management, 10 Hyderabad Rd, Singapore 119579

प्रवेश शुल्क (पुस्तके व परिक्षा फी धरून) : ५० $ वार्षिक (प्रवेश घेतल्या दिवसापासून वर्षभर)
साधने: पेन्सिल बॉक्स शिवाय कोणत्याही साधनांची गरज नाही. 

टीप: ११ वर्षापर्यंतच्या मुलाच्या कमीतकमी एका पालकाचे व १२ पूर्ण मुलाचे स्वतःचे ममंसिं सभासदत्व असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा सचिन जंगम यांना +६५-८१३५३४२५ वर किंवा marathishala@mmsingapore.org वर.

सस्नेह,
आपली,
ममंसिं कार्यकारिणी

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software