• About Us
  • सहभागी वाचक - जे जे उत्तम साहित्यवाचन - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

सहभागी वाचक - जे जे उत्तम साहित्यवाचन - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

  • 02 Sep 2022
  • 20:00 - 22:00
  • GIIS Punggol
  • 4

Registration


Register

नमस्कार मंडळी!

गेल्या दोन वर्षांतल्या निर्बंधांचं विघ्न दूर होऊन ह्या वर्षी गणरायाचे धामधुमीत आगमन होत आहे आणि पूर्वीपेक्षाही जास्त उत्साहाने आपण त्याचे स्वागत करायचे आहे. विद्याधिपती व कलाधीश अशा गणरायासमोर “जे जे उत्तम” या कार्यक्रमात आपण दरवर्षी मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्यकृतींचे वाचन करत असतो. ह्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे त्या निमित्त, “जे जे उत्तम” या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे 
“स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव”. या निमित्ताने आपण स्वातंत्र्यसेनानींच्या अपूर्व लढ्यावर आधारित साहित्य वाचन करणार आहोत. 

मग वाट कसली पाहताय? लवकरात लवकर तुम्हाला आवडलेल्या अशा उत्तम साहित्यकृतीचा आनंद इतरांना देण्यासाठी वाचक म्हणून आपले नाव नोंदवा. 

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः

तारीखः २ सप्टेंबर २०२२
वेळः सायंकाळी 8वाजता
स्थळः GIIS Punggol
साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीखः 20 ऑगस्ट २०२२
Limit on number of slots: 15

  • ह्या कार्यक्रमात स्वलिखित साहित्य स्विकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • सादर करणाऱ्या प्रत्येक वाचकाला ५ ते ७ मिनिटे  वाचनासाठी अवधी दिला जाईल.
  • कार्यक्रमात भाग घेण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सभासद असणे आवश्यक आहे.
  • कार्यक्रमात विविधता राखण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्य यांची पुनरावृत्ती होऊ नये ह्याची दखल मंडळातर्फे घेतली जाईल, त्यामुळे नोंदणी फॉर्म सोबत आपल्याला ३ स्वातंत्र्यसैनिकांची नावे द्यावयाची आहेत. मंडळ आपली निवड ध्यानात ठेवून आपल्याला "प्रथम या प्रथम सेवा" यानुसार आपल्याला निवडून देईल.
  • आपण सिंगापूर मध्ये आहोत हे ध्यानी ठेऊन प्रक्षोभक भाषण, निंदा नसावी. त्यामुळे तुम्ही जे वाचणार आहात ते मंडळाला कळवणे जरुरी आहे. आणि त्यात नंतर बदल करता येणार नाही. 
  • सहभाग व सादरीकरणासंबंधित कोणत्याही बाबतीत मंडळाचा निर्णय अंतिम असेल. 

तर मंडळी, लवकरात लवकर नावनोंदणी करावी, कारण वाचक संख्या मर्यादित आहे. अधिक माहितीसाठी या व्यक्तींना संपर्क करावा.

मोहित-  +6587310185
निरंजन - +6598594414

सस्नेह 
- म. मं. सिं. कार्यकारिणी 


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software