ऋतुगंध - मराठी द्वैमासिक (Rutugandha - Marathi BiMonthly Periodical)"वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशीर" या सहा ऋतूत सहा अंक प्रकाशित करावेत. पर्यावरणाला अनुकूल आणि जगभर सहजगत्या उपलब्ध असावेत, या विचारातून "ऋतुगंध" या आमच्या "ई -द्वैमासिकाचा" जन्म झाला. लेख, कथा, कविता, खास बालांसाठी अशा लिखाणाबरोबरच मंडळातील घडामेडी, आगामी कार्यक्रमांची माहिती असं सर्व आपल्याला या नियतकालिकात दिसेल. जरूर वाचा. सर्वात ताजा अंक https://mmsrutugandha.wordpress.com/ व २०२० पासून चे अंक इथे वाचा https://mmsrutugandha.wordpress.com/ त्याआधीलअंक येथे वाचता येतील: https://mmsrutugandha.wordpress.com/ | ऋतुगंध संपादन समिती २०२०आपली यावर्षीची ऋतुगंध संपादन समिती याप्रमाणे असेल:
|
ऋतुगंधच्या आमच्या प्रिय वाचक आणि लेखक मित्रांनो नमस्कार!!!
लॉकडाऊनच्या ह्या काळात कित्येक दिवस, आठवडे, महिने आपले विश्व 'घरातल्या घरात' मर्यादित राहिले. आपल्यापैकी बहुतेक सर्वांनी लॉकडाऊनच्या ह्या काळात वेळेअभावी राहून गेलेल्या अनेक गोष्टी करु पाहिल्या असतील. आपले अनेक छंद पुन्हा एकदा जोपासून बघण्याची संधी लॉकडाऊनमधे आपल्याला मिळाली. तुमचा हा आनंद द्विगुणित व्ह्यावा ह्या हेतूने ॠतुगंधच्या पुढील अंकाची संकल्पना आम्ही काहीशी अशीचं ठेवली आहे. वाटते ना उत्सुक्ता पुढील अंकाची? तर, आमच्या प्रिय वाचक आणि लेखक मित्रांनो ऋतुगंधचे पुढील अंकासाठी लिहिलेले पत्रक खाली दिले आहे ते नक्की वाचा आणि तुमचे साहित्य आमच्यापर्यंत पोहचू द्या. आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या कसदार साहित्याची वाट बघत आहोत. लिखाणासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि साहित्य पाठवल्याबद्दल अनेक अनेक आभार.
--------------------------
नमस्कार मंडळी,
या वेळच्या ऋतुगंध कॅलिडोस्कोपचा पुढील विशेषांक आहे "आवडती कलाकृती"
आपल्या पंचेंद्रियांमधील दोन इंद्रियांचा आजच्या काळात आपण सर्वात जास्त वापर करतो, ती म्हणजे डोळे आणि कान, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण सतत काहीतरी पहात, ऐकत, वाचत असतो. परंतु या आधीही आपण अनेक कलाकृतींचा आस्वाद घेत आलो आहोत.
या वेळच्या अंकात आपल्याला आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या कलाकृतीविषयी लिहायचे आहे. या कलाकृती अंतर्गत काय काय येते? उदा. - चित्रपट, नाटक, पुस्तक, ऐतिहासिक वास्तू, संगीत, चित्र, शिल्प.. यातील काही कलाकृती आपल्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवून जातात. आपल्याला त्याविषयी लिहायचे आहे.
लेखाचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:
१. आपल्याला अत्यंत आवडणारी एक कलाकृती आपल्या लेखासाठी निवडावी (उदा. सिंहासन हा चित्रपट-लेख सिंहासन या चित्रपटावर असावा)
२. कलाकृती च्या निर्मिती विषयी माहिती द्यावी (उदा. लेखक, चित्रकार, कलाकार यांच्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी).
३. ही कलाकृती आपल्याला का आवडते याविषयी लिहावे.
४. या कलाकृतीने आपल्या आयुष्यावर, व्यक्तिमत्वावर, मानसिकतेवर कसा ठसा उमटवला आहे हे लेखातून अभिप्रेत आहे.
५. आपला फोटो तसेच कलाकृतीचा फोटो लेखसोबत जोडावा.
६. लेख मराठीत टाइप केलेला असावा. (इंग्लिश मध्ये पाठवू नये, इंग्लिश मध्ये असल्यास त्याचे भाषांतर करून घ्यावे)
७. लेख या पूर्वी कुठेही - सोशल मीडिया किंवा इतर अंकात - प्रसिद्ध झालेला नसावा.
८. Vlog हे ही वरच्या फॉरमॅट मध्ये तयार करावे,आपण vlog मध्ये फोटोज पण ऍड करू शकता.
९. नियमित सदर असलेल्या लेखकांनी, आपले लेख तसेच व्हिडीओ पाठवावे.
१०. लहान मुलांनाही काही कथा किंवा आवडत्या पुस्तक, गाणी, गोष्ट, चित्र याविषयी साहित्य किंवा vlog पाठवता येईल.
११. केवळ महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या विद्यमान सभासदांचे साहित्य विचारात घेण्यात येईल.
आपले लेख, फोटो, vlog rutugandha@mmsingapore.org वर पाठवावे.
लेख पाठवण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2020 आहे.
तेव्हा आपल्या आठवणींना उजाळा देऊन या विशेषांकाच्या तयारीला लागूया.
सस्नेह
- म. मं. सिं. ऋतुगंध समिती