• Home
  • कलामहोत्सव २०१४

कलामहोत्सव २०१४

  • Sat, September 13, 2014
  • Sun, September 14, 2014
  • 13 Sept- Khoo Auditorium, सिंगापूर चायनीज गर्ल्स स्कूल. AND 14 Sept- SOTA , धोबी घाट स्टेशनच्या समोर.


कलामहोत्सवात असणार आहेत दोन नाटकं आणि एक गाण्यांचा कार्यक्रम.  

मंडळी तारखांची नोंद घ्या१३ आणि १४ सप्टेंबर २०१४.  

स्थळ: १३ तारीखKhoo Auditoriumसिंगापूर चायनीज गर्ल्स स्कूल.  १४ तारीखSOTA धोबी घाट स्टेशनच्या समोर.


परंपरा कायम राखत सादर करत आहोतआपल्या कलाकारांचे धमाल विनोदी नाटक "तरुण तुर्क… म्हातारेss अर्क"  १३ तारखेलाशनिवारी संध्याकाळी.

पंडित विजय कोपरकर हे भैरव ते भैरवी या शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांच्या कार्यक्रमाद्वारे आपल्या भेटीला येतायत १३ तारखेलाशनिवारी दुपारी. हा कार्यक्रम शास्त्रीय संगीताचा नसून चित्रपट संगीताचा आहे याची कृपया नोंद घ्या.

दुसरं नाटक असणार आहे, flying from Mumbai सुप्रसिद्ध कलाकार मोहन जोशीमाधवी गोगटे यांच्या संचात 'थोडंसं लॉजिक थोडंssसं मॅजिक', १४ तारखेला रविवारी संध्याकाळी.

याचबरोबर खमंग आणि चटपटीत खाऊचे stalls, दिवाळीसाठी हलकी फुलकी खरेदी आणि बरंच काही… आहे ना भरगच्च कार्यक्रम!

कलामहोत्सव मधील कार्यक्रमांच्या तिकीट विक्रीविषयी सविस्तर लवकरच कळवू. तोवर आपल्या डायरीत तारीखा नोंदवून ठेवा.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software