Smaranika

Smaranika is an annual souvenir published by MMS during Ganesh Festival which reaches all attending families and members.

It carries quality literature contributed by our members, advertisements & compliments messages from members, patrons, donors & well-wishers. Our members tend to keep it for years and refer to it whenever they need any information. It is an effective platform for businesses to advertise and reach the Maharashtrian diaspora in Singapore.

Appeal for Contributions to Smaranika 2018

महाराष्ट्र मंडळ आणि मी

महाराष्ट्र मंडळाला २४ वर्ष पूर्ण होत आहेत! आत्तापर्यंत तुमच्या आमच्या सारखे हजारो लोक मंडळाशी या ना त्या नात्याने बांधले गेले आहेत. किती तरी आठवणी सगळ्यांच्याच मनात घर करून असतील. त्यांना उजाळा देऊया आणि आनंदाचे, गंमतीचे क्षण पुन्हा एकदा अनुभवुया.

या वर्षीच्या रौप्य महोत्सवी स्मरणिकेसाठी आपण काय काय पाठवू शकाल ? मंडळाच्या बहुरंगी आणि बहुआयामी कार्यक्रमांच्या आठवणी, कार्यकारिणीत काम केल्याचा अनुभव, मंडळामुळे वाढलेला आपला वैयक्तिक मित्र परिवार, सुख-दुःखात मिळालेली साथ, घरापासून दूर मिळालेलं घरपण, गणेशोत्सव, नाटक, दिवाळी, गुढी पाडवा, होळी, हळदी-कुंकू, फन-फेअर, वाचनालय, शब्दगंध, स्वरगंध, ऋतुगंध, मराठी शाळा, सहल, क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम असे कितीतरी विषय आहेत. यातला किंवा मंडळाशी निगडित असा एखादा विषय निवडा आणि त्याविषयीच्या आठवणी, आढावा, अनुभव आम्हाला लेख, कविता, चित्र किंवा फोटो-कोलाज स्वरूपात नक्की पाठवा.

हे सगळे पाठवा smaranika@mmsingapore.org वर १० ऑगस्ट पर्यंत. त्याबरोबर आपला एक छोटा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील पाठवा. अनुभव पाठवत असाल तर त्यासंदर्भातला एखादा फोटो असेल तर तो ही मेल ला अटॅच करून पाठवलात तर वाचणाऱ्यांना अजून मजा येईल.

शब्दमर्यादा ८००. आणि हो, मंडळाचे सभासदत्व असणे गरजेचे. याची एक सविस्तर मेल तुम्हाला पुढच्या आठवड्यात येईलच.

आम्ही तुमच्या मेलची वाट पाहू.

- स्मरणिका टीम २०१८


Smaranika 2016

Smaranika 2015

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software