ऋतुगंध नियतकालिक (Rutugandha Periodical)ऋतुगंध हे सिंगापुरातल्या महाराष्ट्र मंडळाने चालवलेले ई-अंक. सिंगापूरमध्ये एकच एक ऋतु असला तरी त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ऋतुपर्वांचा आनंद घेता येतो म्हणून नाव ऋतुगंध! गेली १७ वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे. पूर्वी तंत्रज्ञानाच्या अभावी अगदी हस्तलिखित अंकांपासून सुरु करुन आज एका ऑनलाईन ब्लॉगच्या स्वरुपात अनेक लोकांपर्यंत सहज पोचणाऱ्या रुपापर्यंत त्याचा प्रवास झाला आहे. ह्या काळात ऋतुगंधला अनेक उत्तमोत्तम संपादकमंडळी, लेखक-कवी-चित्रकारांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला. अनेक जुने अंक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि लवकरच सगळे जुने अंक ह्याठिकाणी उपलब्ध होतील. मंडळाच्या सदस्य व त्यांच्या आप्तांच्या साहित्यिक प्रतिभेला, हौसेला एक व्यासपीठ मिळवून देणे व त्यायोगे सिंगापुरात मराठी भाषेच्या संवर्धनास हातभार लावणे हे ऋतुगंधचे ध्येय आहे. आजवर मंडळाच्या मराठीप्रेमी वाचक-लेखक सदस्यांचे उदंड प्रेम ऋतुगंधला लाभले आहे आणि यापुढेही हे प्रेम मिळत राहील, वाढत राहील ह्याचा आम्हाला विश्वास वाटतो. ऋतुगंधबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, ऋतुगंध समितीत सामील होण्याची मनिषा असल्यास किंवा ऋतुगंधमध्ये आपले साहित्य प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास rutugandha@mmsingapore.com ह्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. धन्यवाद! | ऋतुगंध संपादन समिती २०२२आपली यावर्षीची ऋतुगंध संपादन समिती याप्रमाणे असेल:
|
नमस्कार
‘ऋतुगंध -वसंत’ २०२२ या ई अंकाच्या ‘श्री व सौ’या संकल्पनेवर आधारित असलेल्या कथा ,कविता,लेख,विडिओ तसेच प्रवासी अनुभव, आपल्याला आवडलेल्या पुस्तकाचे रसग्रहण’ पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. या आवाहनाला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
हे साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख ५ मे २०२२ होती. अगदी शेवटच्या बारा तासातही आमच्या ‘उत्साही’लेखकांनी सुंदर लेख,कथा लिहून आमच्याकडे पाठवले. तसेच बाल कलाकारांचे विडिओ सुद्धा पाठवले.ते सुखरूप पोचले. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून दर्जेदार आणि मनोरंजक असे साहित्य वेळेत पाठवल्याबद्दल आपले मनापासून कौतुक आणि आभार!असेच लेखन आपण आगामी अंकासाठीही कराल अशी खात्री आहे.
आता लवकरच या साहित्याचे आणि विडिओ चे संपादन आणि सादरीकरण ‘ऋतुगंध-वसंत ईअंकात’आपल्याला पाहायला,वाचायला मिळेल. तसेच या अंकाचे ‘ऑनलाईन प्रकाशन ‘करण्याचा’प्रस्ताव विचारात घेतला आहे. त्याची तारीख लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल.आमची सर्व टीम त्यासाठी मेहनत घेऊन, आपापले कौशल्य वापरून कामाला लागली आहे.
आपला लोभ आहेच,असाच राहू द्यावा. ही विनंती.
धन्यवाद!
ऋतुगंध संपादन समिती