हसत खेळत मराठी

मुलांना मराठी बोलता व वाचता यावे यासाठी अनौपचारिक मराठी शाळा !!

गोष्टी • गाणी  • खेळ  • पुस्तकेनमस्कार पालक हो,

सिंगापूरमधे आपल्या छोट्या बालमित्रांसाठी मराठी शाळा असावी असे मंडळाचे एक जुने स्वप्न आणि पालकांची मागणी होती. ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होतो आहे की शनिवार, ६ मे २०१७ पासून मराठी शाळा सुरु होत आहे.

'हसत खेळत मराठी' चे धोरण असे आहे:

  • मराठी मुलांना त्यांची मातृभाषा आणि संस्कृती यांची ओळख व्हावी हा मराठी शाळा सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 
  • शाळेत मराठी ऐकणे, वाचणे, बोलणे शिकवले जाईल. 
  • मराठी संस्कृती, सण आणि उत्सव याची माहिती करून देणे ह्यावरही भर असेल. 
  • गोष्टी, गाणी, खेळ आणि मुलांना आवडतील असे प्रकल्प अश्या माध्यमातून मुलांना मराठी शिकवले जाईल. 
  • शाळा जरी मे महिन्यात सुरु होत असली तरी शाळेत प्रवेश कधीही घेता येईल.
  • एखादा आठवडा न येता आल्याने मुलाला पुढच्या वर्गातील समजण्यास अडचण होणार नाही असाच शाळेचा अभ्यासक्रम असेल. पण झालेला अभ्यासक्रम पुन्हा शिकवला जाईलच असे नाही.
  • मुलांनी ममंसिं वाचनालयातून दर वेळी एक मराठी पुस्तक न्यावे असे उत्तेजन आम्ही त्यांना देऊ. त्यासाठी पालकाचे अथवा मुलाचे स्वत:चे ममंसिं वाचनालय सभासदत्व असणे गरजेचे आहे.
मराठी शाळेतील मुले आजी - आजोबा, मित्र व नातेवाइकांशी मराठीत संवाद साधू शकतील. मंडळाच्या निरनिराळ्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन मराठी भाषेतील प्रगती सादर करतील.

नावनोंदणीसाठी माहिती खालील प्रमाणे:

शाळेची वेळ: दर शनिवारी दुपारी १:४५ ते ४ (६ मे २०१७ पासून)
वयोगट: ५ पूर्ण ते १३ पूर्ण
स्थळ: ग्लोबल इंडियन ईंटरनॅशनल स्कूल, मराठी ग्रंथालयाचा वर्ग, क्वीन्सटाऊन, १ मे-चिन रोड, सिंगापूर - १४९२५३

प्रवेश शुल्क: १०$ वार्षिक (१ मे २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७)
साधने: वही, पुस्तक, पेन्सिल अशा कोणत्याही साधनांची गरज नाही.

टीप: ११ वर्षापर्यंतच्या मुलांच्या कमीतकमी एका पालकाची व १२ पूर्ण मुलांचे स्वतःचे ममंसिं सभासदत्व असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा प्राजक्ती मार्कण्डेय यांना +६५-९८२८२३४५ वर किंवा marathishala@mmsingapore.org वर.

तुम्ही 'हसत खेळत मराठी' ह्या मंडळाच्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन दिले त्याबद्दल तुमचे आभार. शाळेला उत्तम प्रतिसाद देऊन या प्रकल्पाला यशस्वी करावं ही विनंती ! 


Enrol Your Child

  • No upcoming events

What We Covered So Far

Want To Be A Part of Marathi Shala Team?

We need teachers for हसत खेळत मराठी. 

We have a team in place for Content creation and Administration.

Fill our Volunteering form to know your interest to teach or to be a part of the content and administration team. We will contact you as required.

Powered by Wild Apricot Membership Software