गणपतीची देणगी इथे द्यावी CLICK HERE for MMS Ganeshotsav '26 Donation
नमस्कार मंडळी,
आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण Little India (2 Owen Road, Farrer Park, Singapore 218842) येथे सार्वजनिक गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करणार आहोत.
त्यासाठी आपल्याला येत्या काही दिवसात अधिकृत परवाने तसेच मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
गणेशोत्सव आपल्यासाठी केवळ एक सण नाही, तर तो संस्कृती जतन करण्याचा आणि एकत्र येण्याचा उत्सव आहे. मंडप, सजावट, सामाजिक उपक्रम आणि मंडपातील सुरक्षा व स्वच्छता यासाठी मोठ्या प्रमाणावर मंडळ आर्थिक तरतूद करत असते. त्यासाठी यावर्षीही आपले सहकार्य व आर्थिक पाठिंबा लाभेल अशी आशा आहे.
तरी आपण या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी, आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती ऐच्छिक देणगी (वर्गणी) देऊन बाप्पाच्या चरणी सेवा रुजू करावी, ही नम्र विनंती.
बाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो, हीच प्रार्थना!
देणगीसाठी ई-मेलमध्ये दिलेले पर्याय वापरून सहज ऑनलाईन योगदान देता येईल.
देणगीसाठी:
1. Pay using this UEN: S94SS0093G
2. Pay using this QR Code:
3. Account transfer to DBS Bank
Account #: 0019044375
Account Type: Current Account
Account Holder's Name: Maharashtra Mandal (Singapore)
Subject: GE8 Ganeshotsav Donation
4. Use other payment options using the following link
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
कार्यक्रम: श्रावणसरी (मंगळागौर पूजा, आरती, खेळ व स्नेहभोजन)
दिनांक: मंगळवार, 18 ऑगस्ट 2026
वेळ: सायंकाळी 6 ते 9
स्थळ: SP Jain School of Global Management, 10 Hyderabad Rd, HortPark, Singapore 119579
नमस्कार मैत्रिणींनो..
पावसाच्या सरी, हिरव्यागार सृष्टीचा दरवळ आणि श्रावणाचा नाजूक सुगंध... अशा या मंगलमय वातावरणात, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास स्नेहमेळावा — “श्रावणसरी”!
मंगळागौर... स्त्रियांच्या हास्यविनोदाचा, नृत्यगानाचा आणि परंपरेच्या उत्सवाचा एक सुंदर सोहळा.
म्हणूनच, आपण एकत्र येऊन करूया मंगळागौरीची पूजा, खेळूया पारंपरिक झिम्मा-फुगडी आणि घेऊया हळदीकुंकवाचा स्नेहगंध.
चला तर मग..... नऊवारी साडीत, गजऱ्याच्या सुगंधात, सख्यांच्या संगतीत चिंब भिजूया श्रावणसरीच्या रंगात!
कार्यक्रमाची रूपरेषा:
संध्याकाळी 5.00 ते 6.00 – मंगळागौर पूजा व आरती
संध्याकाळी 6.00 ते 9.00 – पारंपरिक खेळ, गाणी, झिम्मा-फुगडी, रुचकर स्नेहभोजन
तिकीट दर:
ममंसिं सभासद (स्त्रिया) - $20
पाहुणे स्त्रिया (Non-Member) - $30
मुले (12 वर्षा खालील) - $15
5 वर्षाखालील मुलामुलींना - तिकीट नाही.
तिकीट दरात जेवण समाविष्ट असून प्रत्येक तिकिटाला केवळ एकच बेन्टो बॉक्स मिळेल.
मर्यादित जागा! लवकरात लवकर आपली तिकिटे नोंदवा.
अधिक माहितीसाठी समन्वयकांशी संपर्क साधा:
दीप्ती हिर्लेकर: + 65 88760367
रेश्मा कामत: +65 82096563
नावनोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा:
https://www.mmsingapore.org/event-6768759
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2026
नमस्कार मंडळी...
गप्पा, मैत्री, धमाल आणि थोडीशी रंगतदार स्पर्धा... या सगळ्यांचा आनंद एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल, तर महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे कॅरम स्पर्धा!
आपल्या मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला तुम्ही नेहमीच भरभरून प्रतिसाद देता. त्याच उत्साहात आता कॅरम स्पर्धेत सहभागी होण्याची वेळ आली आहे!
घरच्या घरी, मित्र-परिवारासोबत कॅरमचा डाव रंगवण्याची मजा आपण सगळेच घेतो. आता तोच आनंद, तीच मैत्री आणि थोडीशी स्पर्धेची रंगत घेऊन मंडळाच्या कॅरम स्पर्धेत सहभागी व्हा.
चला तर मग, स्ट्रायकर हातात घ्या, नेम साधा आणि या धमाल स्पर्धेचा भाग बना!
दिवस: 22nd Aug 2026 वेळ: सकाळी 9:30 ते सायं. 5:30 नाव नोंदणीची अंतिम तारीख: 16th Aug 2026
स्थळ: Association of Carrom Singapore, Foo Wah Building 45 Jalan Pemimpin #08-01 Singapore 577197 (Exit Via Marymount MRT Exit B) नोंदणी - https://www.mmsingapore.org/event-6779310 ठळक वैशिष्ट्ये 1. एकूण 24 खेळाडू 2. प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 5 सामने खेळण्याची संधी 3. प्रवेश शुल्क - फक्त $25 4. वयोमर्यादा - खुला गट (10 वर्ष आणि पुढे) 5. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना बक्षिसे 6. प्रत्येक खेळाडूला 'Medals for Participation'! नोंद: कॅरम स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क:
आशिष उत्तरवार : +65 9337 0155
दीपक देशपांडे : +65 90827203
Email: feedback@mmsingapore.org
सस्नेह, म.मं.सिं. कार्यकारिणी
Note: Organizers reserve the right to cancel the event due to unforeseen circumstances or change the match rules, game format
म.मं.सिं. Karaoke
आपल्या मंडळाचा कराओके उपक्रम तुम्हाला किती आवडतो आणि तुम्ही त्याची किती आतुरतेने वाट पाहत असता, हे वेगळं सांगायलाच नको! २६ जूनच्या कार्यक्रमानंतर सर्व गायक आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहून आम्हाला पक्की खात्री होती की तुम्ही पुढच्या कार्यक्रमासाठी लगेच तयार असणार!
तुमच्या याच आग्रहा खातर आम्ही पुढची तारीख नक्की केली आहे.आम्हाला माहित आहे की तुम्ही पुन्हा एकदा आठवड्याची कामाची धावपळ आणि ताण विसरून हिंदी-मराठी गाण्यांच्या या मैफिलीत सामील व्हायला उत्सुक आहात.
म्हणूनच, तुम्ही नक्की येणार हे गृहीत धरून आम्ही नोंदणी सुरू करत आहोत! लवकरच खाली दिलेल्या लिंकवरून आपली नोंदणी करा!
कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे:
दिवस:२८ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)
वेळ: सायं. ६ वाजल्यापासून
ठिकाण: The Tropica Function Hall Tampines Avenue 1 Singapore 529777
१. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. २. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी (गायक अथवा प्रेक्षक) मंडळाचं सदस्यत्व असणं गरजेचं नाही (हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे). परंतु सभासदेतर इच्छुक गायकांसाठी फक्त ठराविक जागा शिल्लक ठेवल्या आहेत.
अधिक माहितीसाठी खालील समन्वयकांना संपर्क करा.
अजित वैद्य : ९८८०७९८१
आशिष प्रधान : ९२७६३०५३
नावनोंदणी - https://www.mmsingapore.org/event-6786608
मनसोक्त गाण्यासाठी आणि संगीत व मनोरंजनाने भरलेल्या संध्याकाळचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा!
तुमची आवडती गाणी, तुमचा उत्साह आणि मित्र-मैत्रिणींना घेऊन या!
धन्यवाद,
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699