• Home
 • दूर देशीही नांदे, माझी मराठी आनंदे - बाल गोपालांसाठी मराठी स्पर्धा

दूर देशीही नांदे, माझी मराठी आनंदे - बाल गोपालांसाठी मराठी स्पर्धा

 • Sat, October 17, 2015
 • 2:00 PM
 • Global Indian International School, Queenstown, AV room

Registration

 • Open to MMS members or their children.
  Age groups as follows-

  १. अंकुर (२००७ - २०११ मध्ये जन्म)
  २. पालवी (२००४ - २००६ मध्ये जन्म)
  ३. मोहोर (२००० - २००३ मध्ये जन्म)

Registration is closed

महाराष्ट्रातील डॉ मंजुषा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत महाराष्ट्र राज्य सरकारच्या भाषा संचालनालयाने "दूर देशीही नांदे, माझी मराठी आनंदे" हा उपक्रम हाती घेतला आहे.

इतर देशांत वाढणारी नवी पिढी मायमराठीला बिलगून येते आहे का, तिला मराठीच्या पदराखाली ठेवण्यासाठी काय करता येईल ह्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. त्यातली पहिली पायरी म्हणजे उगवत्या पिढीसाठी काही स्पर्धा. भाषा संचालनालय जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांबरोबर मिळून हा उपक्रम हाती घेते आहे. मंडळांनी भरवलेल्या स्पर्धातील विजेत्यांना संचालनालय प्रशस्तिपत्रे देणार आहे.

सिंगापुरातली नवी पिढी मराठीत रमली तर आपल्या सगळ्यांना आनंदच होईल आणि म्हणूनच आपण काही स्पर्धांचं आयोजन करतो आहोत.

स्पर्धा ऑक्टोबर १७ रोजी दुपारी २-५ या वेळात ग्लोबल इंडियन इंटरनँशनल क्वीन्स टाउनच्या एवी रूम मध्ये होतील. स्पर्धा तीन वयोगटात घेतल्या जातील आणि भाषिक खेळ असं स्पर्धांचं स्वरूप राहील. प्रत्येक वयोगटासाठी वेगळे खेळ असतील आणि तयारीसाठी त्याचा तपशील तुम्ही नावनोंदणी केल्यावर तुम्हांला कळवू. तीन वयोगट पुढील प्रमाणे:
१. अंकुर (२००७ - २०११ मध्ये जन्म)
२. पालवी (२००४ - २००६ मध्ये जन्म)
३. मोहोर (२००० - २००३ मध्ये जन्म)            


वेळेत नोंदणी केली असेल तरच स्पर्धेत भाग घेता येईल. आपली नांवे आणि तपशील मंडळाच्या वेबसाइटवर १३ आक्टोबर पर्यंत नोंदवा. 

अधिक माहिती साठी feedback@mmsingapore.org या इमेल पत्त्यावर किंवा 98001491 या फोन नंबरवर संपर्क करा. 


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software