सुनंदन लेले हे नाव मराठी क्रिकेट प्रेमींसाठी नवीन नाही, बरोबर ना? १९८५ ते २००४ दरम्यान श्री लेले यांनी वार्ताहर ते संपादक असा रंजक प्रवास "दैनिक केसरी" व पाक्षिक "एकच षटकार" या वृत्तपत्रांसाठी केला.
"बारा गावचं पाणी" हा त्यांचा कार्यक्रम याच अनुभवांचा, किश्यांचा परिपाक आहे. याच नावाचं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे.
सुनंदन लेले यांनी हा कार्यक्रम बऱ्याच देशांत सादर केला आहे तिथला report असा आहे की gents cricket fans पेक्षा ladies न हा कार्यक्रम खूप आवडतो. "बारा गावचं पाणी" हा वेगळा कार्यक्रम ५०हून अधिक फोटो आणि काही मोजक्या video clips सह सादर होईल.
श्री सुनंदन लेले यांची अधिक माहिती इथे आहे http://sunandanlele.com/
म म सिं चा वाचनालय दिवस आपण यंदा "बारा गावचं पाणी" या कार्यक्रमाने साजरा करणार आहोत.
कार्यक्रमाचा तपशील असा आहे:
तारीख: १० जानेवारी २०१६, रविवार
स्थळ: AV Room, ग्लोबल इंडियन शाळा, १ मेई चिन रोड, क्वीन्सटाऊन.
वेळ: दुपारी २:३० ते ४ (त्यांचे संध्याकाळचे विमान असल्याने कार्यक्रम दुपारी आहे)
४ ते ४:१५ वाचनालय स्वयंसेवकांचे कौतुक ४:१५ ते ४:४५ चहापान
कार्यक्रमाचे तिकीट: सभासद $५, पाहुणे $१५, मुले (५ वर्षांवरील) $५. आपले नाव आजच नोंदवा feedback@mmsiingapore.org वर किंवा पुष्कर प्रधान 81686956 कडे.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699