• Home
  • शब्दगंध‏ एप्रिल २०१६ आणि ख्यातनाम भाषाशास्त्रज्ञ डॉ रमेश धोंगडे यांच्या समवेत गप्पागोष्टी

शब्दगंध‏ एप्रिल २०१६ आणि ख्यातनाम भाषाशास्त्रज्ञ डॉ रमेश धोंगडे यांच्या समवेत गप्पागोष्टी

  • 03 Apr 2016
  • 17:30 - 20:30
  • TBA - West Singapore
  • 28

Registration


Registration is closed

'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण !

शब्दगंधची ह्यावेळची तारीख, वेळ आणि बाकीचे तपशील खालीलप्रमाणे:
तारीख : ३ एप्रिल २०१६ - रविवार
वेळ : सायंकाळी ५.३० वा
जागा : नोंदणी केलेल्या इच्छुकांना नंतर कळवण्यात येईल

विषय :

  • कुतूहल 
  • खालील फोटो * ( See the image below )
  • निसर्ग - एक संकल्पना (अर्थात निसर्गावर अथवा निसर्गासंबंधित कुठलाही पैलू निवडून त्यावर काव्य)
  • दाम करी काम (समस्या पूर्ती )

*If you can't see the below image, please click on Display Images Below link at the top of this email.

ख्यातनाम भाषाशास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ रमेश धोंगडे हे सध्या सिंगापूरमध्ये आहेत. डॉ धोंगडे डेक्कन कॉलेजचे भाषाशास्त्र विभागप्रमुख होते. "मराठी समाजाचा भाषिक नकाशा" या राज्य मराठी विकास परिषदेच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ते प्रमुख सल्लागार होते. बालभारतीने आणलेल्या नव्या इंग्रजी अभ्यासक्रमाचेही ते प्रमुख सल्लागार होते. ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसनी बाजारात आणलेली त्यांची इंग्रजी -मराठी डिक्शनरी प्रमाण मानली जाते. त्यांना भाषाशास्त्र आणि साहित्यसमीक्षेवरच्या पुस्तकांसाठी राज्य पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत।

डॉ धोंगडे येत्या ३ एप्रिलच्या शब्दगंधला विशेष पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. त्यांचे विचार ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे. शब्दगंधची शेवटची २०-३० मिनिटं आपण त्यांना बोलायला आणि प्रश्नोत्तरांसाठी राखीव ठेवणार आहोत. त्यामुळे भाषा, भाषासंगोपन (अर्थात सिंगापुरातल्या नव्या पिढीचं मराठी), साहित्य /समीक्षेबाबतचे प्रश्न आवर्जून घेऊन या.

कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी कार्यक्रमाच्या निदान तीन दिवस आधी नोंदणी करावी .

कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी  नन्दकुमार देशपांडे (९१९१२६४७) यांच्याशी संपर्क साधावा. अथवा, मंडळाच्या कार्यकारिणीस संदेश  पाठवा.

आपली नम्र,
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software