• Home
  • Swaragandha Vocal & Instruments Auditions 2016

Swaragandha Vocal & Instruments Auditions 2016

  • Sun, May 29, 2016
  • 4:30 PM - 8:30 PM
  • Global Indian International School, 1 Mei Chin Road, (S)149253

Registration


Registration is closed
<Click here for English Text>

नमस्कार,

मराठी परंपरेत संगीताला असलेलं अलौकिक स्थान आपण सिंगापूरमध्ये सुद्धा जपलंय जे तुम्हाला वर्षभरात होणाऱ्या अनेक कार्यक्रमातून जाणवत असेलच. मग गणेश-उत्सवांतर्गत असलेला भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम असो किंवा 'अद्वैताची गाणी' सारखा अनोखा, नव्या गाण्यांचा प्रोग्राम! 'ममसिं' चा संगीताला वाहिलेला उपक्रम - स्वरगंध दर वर्षी अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यास नेहेमीच प्रयत्नशील असतो.

'महाराष्ट्र मंडळ सिंगापूर'च्या अष्टपैलू सभासदांना आणखी संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वरगंध आता सज्ज होत आहे या वर्षीच्या निवड चाचणीसाठी. 

गायन आणि वादनाच्या निवड चाचणीबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे -

गायन 

विभाग : भावगीत, नाट्यगीत, लोकसंगीत आणि अभंग
वयोमर्यादा : नोंदणी च्या दिवशी १५ वर्षे पूर्ण व वरील

  • इच्छुक गायक व गायिकांनी आपली नावे १५ मे २०१६ च्या आत वेबसाईट वर नोंदवावी. 
  • त्यानंतर कलाकारांनी आपल्या आवडीची ३ गाणी रेकॉर्ड करून पाठवायची आहेत (फक्त मुखडाही पुरेसा आहे). साथीला तानपुरा घेतला तर चालेल पण करावके धून नको. 
  • रेकॉर्डेड गाणी स्मिता अंबिके यांना ८१४३७७९० या क्रमांकावर १५ मे २०१६ च्या आत WhatsApp वर पाठवा.
  • पाठवताना वर नमूद केलेल्यापैकी आपल्या आवडीचा विभाग कळवायलाही विसरू नका.
  • नोंदणी केल्याशिवाय रेकॉर्डेड गाणी पाठवू नयेत ही नम्र विनंती. 
  • पाठवलेल्या गाण्यांच्या आधारे, परीक्षक काही कलाकारांना अंतिम चाचणीसाठी निवडतील. निवडलेल्या कलाकारांना त्याप्रमाणे २१ मे पर्यंत कळविण्यात येईल. 
  • २९ मे ला प्रत्यक्ष अंतिम चाचणी GIIS क्वीन्सटाऊन येथे घेतली जाईल. आपण आधी पाठवलेल्या ३ पैकी १ गाणे परीक्षक आपल्याला साथ संगतीसह सादर करण्यास सांगतील.

वादन 

वयोमर्यादा : नोंदणी च्या दिवशी १५ वर्षे पूर्ण व वरील

इच्छुक कलाकारांनी वाद्य-प्रकार व आपली नावे १५ मे २०१६ च्या आत वेबसाईट वर नोंदवावी. २१ मे पर्यंत कलाकारांना कोणत्या गाण्याला साथ करायची आहे हे कळविण्यात येईल आणि ती प्रत्यक्ष चाचणी २९ मे २०१६ रोजी GIIS क्वीन्सटाऊन येथे घेतली जाईल. 

स्वरगंध निवड चाचणीचा उद्देश हा सर्व सभासदांना समान संधी उपलब्ध व्हावी आणि जास्तीत जास्त कलाकारांना व्यासपीठ मिळावे असा आहे. या चाचणीमधून निवडलेल्या कलाकारांना वर्षभरात होणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेता येऊ शकेल.

तेंव्हा मंडळी तयारीला लागा आणि १५ मे च्या आत नोंदणी करून स्मिता अंबिके यांच्याशी संपर्क साधा.

चाचणी साठी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केवळ सभासदांसाठीच उपलब्ध आहे. नवीन सभासदत्व घेण्यासाठी वा नूतनीकरणासाठी येथे क्लिक करा.

सस्नेह,
आपली कार्यकारिणी 
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर


Dear Members,

Music has a special cherished spot in the minds of all us marathi folks. We are also lucky to have immense musical talent among our members here. Maharashtra Mandal (Singapore) has always endeavoured to bring this talent together and has produced many great programs like Diwali Pahat, Kavyaswaranjali-Adwaitachi Gaani thanks to the amazing effort by our members.

It gives us immense pleasure to announce Swaragandha music auditions. The purpose of Auditions is to neutrally spot and evaluate existing and new musical talent amongst our members. Our aim will be to give platform to as many members as possible this year to showcase their musical artistry.

Auditions are for -  Vocal and Instrumental
Age limit
: 15 years complete on the day of registration and above

Vocal :

Categories - Bhavgeet, Natya Sangeet, Lok Sangeet and Abhang

  • Interested Artists need to register ONLINE and then send their recorded tracks to Smita Ambike via WhatApp (81437790) by 15th May. The judges will short list the artists on the basis of these tracks.
  • Singers need to send 3 songs (just Mukhda is enough) of their choice. Please specify your interest from the above mentioned categories. Tanpura can be used as an accompanying instrument (No karaoke tracks please).
  • The shortlisted singers will be notified by 21st May about their selection.
  • Shortlisted singers need to come in-person for the auditions on 29th May at GIIS
  • The judges will let you know which song to sing from the 3 songs sent on WhatsApp with the accompanying instruments.


Request you to send your tracks only after registering to this event ONLINE.

Instrumental

Interested Artists need to register ONLINE by 15th May. All the Artists will be informed about the songs on which they need accompany by 21st May. They need to attend the auditions in person on 29th May at GIIS. There will be no need to send any recorded tracks.

Registration mandatory. Open for Members only. Please sign up for new memberships or renew your lapsed membership here

Thanks and Regards,
Executive Committee
Maharashtra Mandal (Singapore)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software