• Home
  • सर्जनशील लेखन कार्यशाळा आणि ऋतुगंध २०१५ समितीचं कौतुक

सर्जनशील लेखन कार्यशाळा आणि ऋतुगंध २०१५ समितीचं कौतुक

  • Sat, June 11, 2016
  • 10:20 AM - 12:30 PM
  • Harbour View Towers - lounge, 21 Telok Blangah Drive, 109258
  • 12

Registration


Registration is closed


नमस्कार, मंडळी! 

चांगलं लिहिता यावं, मनातले विचार परिणामकारकपणे शब्दबद्ध करता यावेत असं आपल्याला खूप वेळा वाटतं. पण जमेल का नाही? सुरुवात कशी करायची? मी लिहीन ते चांगलं आहे का सुधारणा हवी हे कोण सांगेल? चांगल्या कथा, कविता, लेख लिहिण्यासाठी काही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वं असतात का? मी लिहिलेलं कोणी वाचेल का नाही? … असे अनंत प्रश्न पडतात आणि हाती घेतलेलं पेन तसंच राहतं, कागद कोराच राहतो.

या प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि अनेक जण त्या निमित्ताने लिहिते झाले. त्यांना थोडी उजळणी मिळावी आणि नव्या लेखकांना उद्युक्त करता यावं म्हणून यावर्षीची कार्यशाळा!    

शिवाय आपला संकल्प लक्षात आहे ना? मराठीशी मैत्री वाढवायची आणि आपल्या ग्लोबल आयुष्यात, बहुभाषिक वातावरणात राहताना थोडं फार का होई ना पण मराठीत वाचन-लेखन सुरु ठेवायचं … मातृभाषेशी नाळ जोडलेली ठेवायची. त्याकरताही ही कार्यशाळा साहाय्यकारी ठरेल, नाही का?  

हे वर्कशॉप कधी आणि कुठे आहे आणि यासाठी रजिस्टर कुठे करायचं याची माहिती खालील प्रमाणे:

पत्ता: Harbour View Towers - lounge (तेलोक ब्लांगा स्टेशन जवळ)
तारीख : ११ जून २०१६, शनिवार 
वेळ : सकाळी १०:० ते १२:३० (१०:० ते १०:० - नावनोंदणी)
शुल्क: सभासदांसाठी $५, पाहुणे $१५ 
नाव-नोंदणीची शेवटची तारीख : ८ जून २०१६

आपलं लिखाण सुधारण्यासाठी आणि ते अधिक रंजक किंवा परिणामकारक कसं करता येईल यासाठी काही तत्त्व आपल्याला कार्यशाळेत शिकायला मिळतील. आधी केलेल्या लेखनावर चर्चा करून त्यातले गुण दोषही आपण जाणून घेऊ शकता.

या कार्यशाळेमध्ये आपल्याला नीतीन मोरे मार्गदर्शन करतील. Linguistics म्हणजेच भाषाशास्त्रामध्ये PhD मिळवलेले नीतीन मोरे हे अनेक वर्षे फेसबुकमध्ये Learning and development विभागाचे मुख्य होते. त्यांचं 'एकलकोंड्याचा कबिला' हे कवितांचं पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं ज्याला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ठ नवोदित काव्य संग्रहाचा पुरस्कार सुद्धा मिळाला.

तुम्ही एकदा लिहिते झालात की तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आपलं ऋतुगंध मासिक आहेच! याच कार्यशाळेच्या निमित्ताने 'ऋतुगंध २०१५' च्या संपादक समितीचं कौतुकसुद्धा आपण करणार आहोत.

तर मंडळी पटापट ८ जून च्या आधी रजिस्टर करून टाका आणि ११ जूनला सकाळी पेन आणि वही घेऊन यायला विसरू नका.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software