• Home
  • अतुल परचुरे यांचा एकपात्री प्रयोग : एक परचुरीत

अतुल परचुरे यांचा एकपात्री प्रयोग : एक परचुरीत

  • Sun, July 17, 2016
  • 5:00 PM - 7:00 PM
  • The Grassroots' Club, 190 Ang Mo Kio Avenue 8, 568046

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे

अतुल परचुरे यांचा एकपात्री प्रयोग : एक परचुरीत !

एक माणूस व अभिनेता म्हणून इतक्या वर्षात भेटलेल्या नमुन्यांचा खमंग चुरचुरीत कार्यक्रम !

विद्याधर गणपुले नावाचा एक सामान्य माणूस….
त्याचा पोपट मरतो. 
खरे तर किती सामान्य गोष्ट. 
पण ती जेव्हा पुण्यात घडते तेव्हा ती सामान्य रहात नाही. 
पुढे काय होते ते प्रत्यक्ष ऐका एक परचुरीत एकपात्री मधे.


नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातील विनोदी भूमिकांमधून आपली छाप पडणारे अतुल परचुरे नेहेमीच लोकांना हसवत राहतात, मग 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' मधील मुकुंदा उर्फ कुंदा भागवत असो किंवा R. K. लक्ष्मण कि दुनिया मधला भावेश. आता सिंगापूरमध्ये हास्य-कारंजी उडवण्यासाठी ते त्यांचा गाजलेला एकपात्री प्रयोग घेऊन येत आहेत त्यामुळे मंडळी हा कार्यक्रम चुकवू नका, १७ जुलै ची संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा.

दिनांक : १७ जुलै २०१६
वेळ : सायं ५ ते ७ वा
स्थळ : ग्रासरूट्स क्लब, १९०, आंग मो क्यो, अॅव्हेन्यु ८, सिंगापूर ५६८०४६

तिकीट दर : **
सभासद : S$ २५, S$ २०
पाहुणे : S$ ३५, S$ ३०
अल्पोपहार : S$ ५ ** (आगाऊ नोंदणी आवश्यक)

** कृपया नोंद घ्यावी - 

  • वय वर्षे २ वरील मुलांना तिकीट लागू आहे. २ वर्षाखालील मुलांना वेगळी खुर्ची नाही.
  • अल्पोपहाराची आगाऊ नोंदणी आवश्यक. कार्यक्रम स्थळी अल्पोपहार विक्री नाही.

तिकीटे मर्यादीत आहेत. लवकर घ्या !

Free seating within the category of tickets you book.

अधिक माहितीसाठी feedback@mmsingapore.org वर संपर्क साधा.

भेटूया तर मग लवकरच.

आपली कार्यकारिणी
ममसिं २०१६

जाहीरात वा प्रसिद्धीसाठी संपर्क साधा pro@mmsingapore.org वर.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software