• Home
 • नाटक व बालनाट्य - कलाकार निवड व कार्यकर्त्यांना आवाहन

नाटक व बालनाट्य - कलाकार निवड व कार्यकर्त्यांना आवाहन

 • Sun, July 31, 2016
 • 10:00 AM - 12:00 PM
 • Global Indian International School, Queenstown Campus, 1 Mei Chin Rd

Registration

 • MMS Membership necessary. If registering kids below 12 yrs of age, the member parent should log in using their id.
मराठी संस्कृतीमधला साहित्य, संगीत, कला याबरोबरचा महत्त्वाचा आणि आपल्या खास आकर्षणाचा पैलू म्हणजे नाटक ! संगीत नाटकापासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत पसरलेली नाटकांची दुनिया आपल्याला नेहेमीच भुरळ पाडते. आपणही दर वर्षी नाटकाची अगदी आवर्जून वाट बघत असतोच. आता या वर्षीच्या नाटकाच्या तयारीला लागायची वेळ आली आहे.

तेंव्हा मंडळी या नाटकांच्या दुनियेत काही काळ हरवून जायला उत्सुक असलेल्या सगळ्यांनी ३१ जुलै ला होणाऱ्या निवड चाचणीत जरूर भाग घ्या.

मोठ्यांचे नाटक आणि बालनाट्य दोन्हीची निवडचाचणी एकाच दिवशी आहे.

स्थळ : GIIS, क्वीन्सटाऊन, १ मे चिन रोड
दिवस : रविवार, ३१ जुलै २०१६
वेळ : सकाळी १० वाजता


मोठ्यांची निवडफेरी
 • अभिनयाच्या निवडचाचणीसाठी त्या दिवशी स्क्रिप्ट दिली जाईल.
 • भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद असणे गरजेचे.
बालनाट्य निवडफेरी
 • वयोमर्यादा ८ ते १५ वर्षे पूर्ण.
 • १२ वर्षे पूर्ण असलेल्या मुलांचे स्वत:चे ममसिं सभासदत्व असणे गरजेचे.
 • १२ वर्षाखालील मुलांच्या किमान एका पालकाचे ममसिं सभासदत्व असणे गरजेचे.
 • मुलांनी स्वत:ची ४-५ वाक्यात ओळख तयार करून यावी. या व्यतिरिक्त कोणत्याही तयारीची गरज नाही.

नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा, बॅकस्टेज मदत

दोन्ही नाटकांसाठी नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा, बॅकस्टेज साठी देखिल आम्हाला खूप मदत लागणार आहे. तरी त्यामधे उत्सुक असलेल्यांनी नावनोंदणी करावी ही विनंती. निवडचाचणीसाठी येण्याची गरज नाही.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) तर्फे सादर झालेल्या नाटकांचा चढता आलेख बघता या वर्षीसुद्धा तसंच काही दमदार आणि दर्जेदार सादर करूया.

अधिक माहितीसाठी पुष्कर +65-81686956 वा नलिनी +65-92957000 यांच्याशी किंवा feedback@mmsingapore.org वर संपर्क साधावा.

सस्नेह,
आपली कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software