नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर), आपणा सर्वांना एका खास गप्पा-गोष्टींच्या मैफिलीला आमंत्रित करीत आहे.
“बंदेमे था दम ...वंदेमातरम ...” हे लगे रहो मुन्नाभाई मधले महात्मा गांधींना जाणून घेण्याविषयीचे गाणे, “कहांसे आया था वो ....” हे थ्री इडियट्स मधले फुन्गसुक वांग्डू (आमीर खान) ह्या कलंदराची ओळख करून देणारे गाणे, किंवा “आला बर्फी ...” हे बर्फीच्या (रणबीर कपूर) मिश्कील खोडसाळ स्वभावाचे गाणे इत्यादी आठवले की त्या गीतांमागील गीतकार स्वानंद किरकिरे ह्यांच्या शब्दांची जादू काय आहे हे कळते.
गीतलेखनासाठी त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तसेच स्क्रीन अवॉर्डसुद्धा मिळाले आहे. पण चित्रपटसृष्टीमध्ये ते गीतकार होण्यासाठी आले नव्हते. ते गीतकार कसे झाले? पार्श्वगायनामध्ये त्यांनी गायलेली गाणी कोणती? नाटकाशी त्यांची नाळ कशी जुळलेली आहे? राजकुमार हिरानीसारख्या इतर कोणत्या आघाडीच्या दिग्दर्शकांबरोबर सोबत त्यांनी काम केलय? ह्या प्रश्नांच्या उत्तरांसोबत जाणून घेऊया स्वानंद किरकिरे ह्यांचा इंदोर ते मुंबई व्हाया दिल्ली प्रवास....! मग गप्पा मारायला येताय ना ?
स्थळ : केंट व्हेल फंक्शन हॉल (कोल्ड स्टोरेजच्या वर)
१०१ क्लेमेंटी रोड सिंगापूर १२९७८७
तारीख : १६ ऑक्टोबर २०१६, रविवार वेळ : संध्याकाळी ५.३० ते ७.३०
सभासद, पाहुणे व लहान मुलांसाठी एकच तिकीट दर आहे : १० $
(तिकिटामध्ये अल्पोपहार समाविष्ट आहे)
मंडळी, मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर आपली तिकिटे नोंदवून टाका !!
सस्नेह,कार्यकारिणी २०१६
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699