• Home
  • दिवाळी आनंद-मेळावा - बालनाटक 'सळो की पळो', फन-फेअर आणि चित्रकला स्पर्धा

दिवाळी आनंद-मेळावा - बालनाटक 'सळो की पळो', फन-फेअर आणि चित्रकला स्पर्धा

  • Sun, November 06, 2016
  • 3:15 PM - 7:30 PM
  • GIIS Queenstown, 1 Mei Chin Road

Registration

  • Kids above 12 and Adults
  • Kids above 12 and Nonmember adults

Registration is closed


नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) तर्फे सादर होत असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांची मालिका दिवाळीनंतरसुद्धा अशीच चालू राहणार आहे. आता आम्ही खास आपल्या बालचमूसाठी एक कार्यक्रम आखला आहे.

६ नोव्हेंबरला आपण सर्वच लहान मुलांसाठी एक आनंद-मेळावा आयोजित केला आहे. ज्यात सुरुवातीला एक चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल. मग १२ धिटुकली मुलं 'सळो की पळो' हे सई परांजपे यांनी लिहिलेलं धमाल नाटक सादर करतील आणि त्यानंतर 'फन-फेअर' ची मजा सर्वांना लुटता येईल. अर्थात मोठ्यांनासुद्धा भरपूर धमाल येईल याची आम्ही खात्री देतो !

'फन-फेअर' मध्ये लहान मुलांनी वेगवेगळ्या खेळांचे स्टॉल लावावेत यासाठी विशेष प्रोत्साहन देत आहोत. या उपक्रमामुळे त्यांना नियोजन, विक्री, प्रसिद्धी, फायदा - तोटा यासारख्या गोष्टी स्वतः अनुभवायला मिळतील.

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे 

दिनांक - रविवार ६ नोव्हेंबर २०१६


वेळ

दु ३:१५ ते ३:३० चित्रकला स्पर्धा नोंदणी
दु ३:३० ते ४:१५ : चित्रकला स्पर्धा (वय वर्षे ४ ते १४) विषय : दिवाळी
दु ४.३० ते ५.३० : बालनाट्य : "सळो की पळो"
दु ५:३० : चित्रकला स्पर्धा निकाल जाहीर
संध्या ५:३५ ते ६ : दिवाळी फराळ वितरण व फन फेअर स्टॉल सेटप
संध्या ६ ते ७:३० : फन फेअर

स्थळ - GIIS क्वीन्सटाऊन, १ मे चिन रोड

तिकीट दर (दिवाळीचा फराळ समाविष्ट)
१२ वर्षाखालील मुले : १०$
ममसिं सद्स्य (१२ वर्षावरील मुले व मोठे) : १५$
सदस्येतर (१२ वर्षावरील मुले व मोठे) : २०$

  • चित्रकला स्पर्धेसाठी A3 आकाराचा कागद,रेखनसाहित्य व रंगसाहित्य स्वत:चे आणावे. रंगसाहित्य कोरडे असावे. फक्त रंगीत खडू, स्केचपेन व पेन्सिल वापराव्या.
  • जेवण व स्नॅक्स ६ वाजल्यापासून विकत घेण्यास उपलब्ध.
फन फेअर स्टॉल बुकींग -
  • फन फेअरमध्ये लहान व मोठेही स्टॉल लावू शकतात.
  • लहान मुलांसाठी स्टॉलचे भाडे १०$. मोठ्यांसाठी २५$.
  • स्टॉलचे बुकींग 5 नोव्हेंबर पर्यंत करणे गरजेचे.
  • स्टॉल घेण्यासाठी सभासद असणे आवश्यक आहे. स्टॉल लावणारे मूल १२ वर्षाखालील असेल तर एका पालकाने सभासद असणे आवश्यक आहे.
  • बुकींग साठी संपर्क करा स्मिता अंबिके यांना ८१४३-७७९० वर किंवा मेल करा vicepresident@mmsingapore.org ला.
  • स्टॉल खेळाचा, खाद्यपदार्थ अथवा टॅटू, मेंदी, nailart, balloon sculpting अशा कार्यशील services चा असू शकतो. वस्तू विक्रीच्या स्टॉलला कमी प्राधान्य देण्यात येईल.
  • स्टॉलवर खेळासाठी आपण जास्तीत जास्त १ डॉलर पर्यंत तिकीट आकारू शकता. टॅटू, मेंदी, nailart, balloon sculpting अशा कार्यशील services च्या आकाराला वा खाद्यपदार्थांना हे बंधन नाही.
  • स्टॉल ३ फुट बाय २ फूट टेबल वर मावला पाहिजे असा असावा.
  • खेळ सुरक्षितता व स्वच्छता यांना धरून असावेत. स्टॉलमुळे शाळेच्या मालमत्तेस वा खेळणा-या व्यक्तीस नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी. भिंतीवर काहीही चिकटवण्यास मनाई आहे. तसेच वीजेचा पुरवठा वा विस्तव लागणारे खेळ ठेवू नयेत.

तेंव्हा मंडळी या आनंद मेळाव्याला जरूर भेट द्या. मोठ्यांच्या नाटकानंतर आपले लहान सवंगडीही आता 'हम भी कुछ कम नही' म्हणत आपल्यासमोर धमाल बालनाट्य सादर करण्यासाठी खूप मेहनत घेऊन सज्ज झाले आहेत; त्यांचं कौतुक करायला तुम्ही सगळे नक्की याल अशी खात्री आहे.

तेंव्हा भेटूया लवकरच.

सस्नेह,
कार्यकारिणी २०१६

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software