• Home
  • Invitation to enrol for "MMS Chingay Parade Performance 2017" participation

Invitation to enrol for "MMS Chingay Parade Performance 2017" participation

  • Thu, December 22, 2016
  • Sun, December 25, 2016
  • Chingay Parade
नमस्कार मंडळी,


सिंगापूरच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना अतिशय उत्साहाचा, धामधुमीचा असतो. चायनीज नवीन वर्षाच्या सुट्ट्या असतात तसेच शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यातलीच सर्वात लोकप्रिय चिंगे परेड!! सजवलेल्या रथांची शोभायात्रा आणि सोबत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले नर्तक, कसरती करणारे लोक यांची रंगीबेरंगी मिरवणूक हे खास आकर्षण !!

२०१७ च्या चिंगे परेडमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र मंडळालादेखील आमंत्रित केले आहे त्यामुळे आपल्यासाठी या वेळची परेड विशेष असणार आहे. १० व ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या परेडमध्ये महाराष्ट्र मंडळ आपल्या फ्यूजन नृत्य व मिरवणुकीने खास ठसा उमटवेल यात शंका नाही.

जे सभासद यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी कृपया १९ नोव्हेंबरच्या पर्यंत आपली नावे नोंदवावी. 

  • चिंगे परेडमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्र मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे. अाता घेतलेले सदस्यत्व २०१७ पर्यंत लागू असेल.
  • १२ वर्षावरील कोणीही यात सहभागी होऊ शकते.
  • २० नोव्हेंबरपासून सराव चालू होईल ज्याचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.

मंडळी, या जल्लोषात सामील होण्यासाठी लवकरात लवकर आपले नाव नोंदवून टाका.

मर्यादित जागा ! त्वरीत नोंदणी करा.

सस्नेह,
कार्यकारिणी २०१६

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software