• Home
  • Chingay Parade 2017

Chingay Parade 2017

  • 10 Feb 2017
  • 11 Feb 2017
  • Chingay Parade

Registration

  • For viewing public. Registration is not required.
नमस्कार मंडळी,


सिंगापूरच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना अतिशय उत्साहाचा, धामधुमीचा असतो. चायनीज नवीन वर्षाच्या सुट्ट्या असतात तसेच शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्यातलीच सर्वात लोकप्रिय चिंगे परेड!! सजवलेल्या रथांची शोभायात्रा आणि सोबत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले नर्तक, कसरती करणारे लोक यांची रंगीबेरंगी मिरवणूक हे खास आकर्षण !!

२०१७ च्या चिंगे परेडमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र मंडळालादेखील आमंत्रित केले आहे त्यामुळे आपल्यासाठी या वेळची परेड विशेष असणार आहे. 

ह्या मिरवणुकीसाठी निवडलेल्या सभासदांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 

१० व ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या परेडमध्ये महाराष्ट्र मंडळ आपल्या फ्यूजन नृत्य व मिरवणुकीने खास ठसा उमटवेल यात शंका नाही.

आपण सर्वानी चिंगे परेडचा जल्लोष मित्रमंडळीसह नक्की बघा 

सस्नेह,
कार्यकारिणी २०१६

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software