एक वर्ष बघता बघता सरले आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. हेमलंबीनाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा - श्री शालिवाहन शक १९३९ - या येणार्या नववर्षारंभासाठी आपणांस आणि आपल्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या गुढीपाडवा कार्यक्रमाला जमून आपण नवी गुढी उभारु या आणि नवीन वर्षाची सुरुवात एकत्र करू या !
कार्यक्रमाचा तपशील असा आहे:-दिनांक - रविवार, २ एप्रिल २०१७वेळ - सकाळी ९:४५ ते दुपारी १ वाजेपर्यंतस्थळ: Alliance Française de Singapour, 1 Sarkies Road, (S) 258130जवळील MRT: Newton (डाऊनटाऊन व रेड लाईन)बस क्रमांक: ४८, ६६, ६७, १७०, १६१, १७१, ७००, ७००-अ, ९६० पार्कींग - Blk 7 Sarkies Road, 7 Sarkies Road (S) 258127
कार्यक्रमाची रुपरेषा अशी आहे:
मराठी उखाणे घेण्याचा लोकप्रिय कार्यक्रम ही होईल च. तेव्हा ईच्छुकांनी तयारी करून या.
तिकीट दर (मराठी सुग्रास जेवण समाविष्ट):
३१ मार्च पर्यंत वेबसाईटवर पूर्ण पैसे भरून तिकीट बुकिंग केल्यास:सदस्य व ५ वर्षांवरील मुले : S$१५ सदस्येतर : S$२५ २ एप्रिल ला कार्यक्रम स्थळी घेतल्यास:सदस्य व ५ वर्षांवरील मुले : S$२० सदस्येतर : S$३०
कृपया नोंद घ्या -
आणि हो मंडळी, कार्यक्रमाला आपल्या मराठमोळ्या पारंपरिक पोषाखात या हे तुम्हाला सांगायची गरज नाहीच. तुमच्या पैठण्या, साज, फेटे, धोतर, मोजड्या बाहेर येऊ द्या. फॅशन शो मधे भाग घेत असाल वा नसाल, झोकात मराठी बाण्यात या ! भेटू या तर मग लवकरच.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699