• Home
  • मराठी शाळा पालक माहिती सत्र

मराठी शाळा पालक माहिती सत्र

  • 15 Apr 2017
  • 16:00 - 17:00
  • मराठी ग्रंथालय वर्ग, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, १ मे चिन रोड, सिंगापूर - १४९२५३

Registration


Registration is closed

नमस्ते शारदे देवी वीणापुस्तकधारिणी ।
विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।। 

नमस्कार पालक हो,

सिंगापूरमधे आपल्या छोट्या बालमित्रांसाठी मराठी शाळा असावी असे मंडळाचे एक जुने स्वप्न आणि पालकांची मागणी होती. ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. दशकाहूनही अधिक काळ नियमित सुरु असलेल्या मंडळाच्या चार उपक्रमात 'मराठी शाळा' ह्या नवीन उपक्रमाची भर करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात आम्हाला पालकांचा आणि शाळेसाठी शिक्षक म्हणून काम करु इच्छिणार्‍या सभासदांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मराठी शाळा सुरु करण्याची योजना सुरु झाली. महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मंडळाचा हा संकल्प साकार होत आहे.

स्थानिक मराठी मुलांना त्यांची मातृभाषा आणि संस्कृती यांची ओळख व्हावी हा मराठी शाळा सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. शाळेतील अभ्यासक्रम साधारणतः असा असेल:
१) शाळेत मराठी समजणे, वाचणे, बोलणे यावर भर असेल.
२) मराठी संस्कृती, सण आणि उत्सव याची माहिती करून देणे ह्यावरही शाळेचा भर असेल.
३) गोष्टी, गाणी,  खेळ आणि मुलांना आवडतील अशा माध्यमातून मुलांना मराठीची गोडी लावायचा प्रयत्न केला जाईल.

पालक म्हणून तुम्हा सर्वांना उत्सुकता असेल की, ही 'मराठी शाळा' नक्की कशी असेल? शाळेमधील शिक्षक कोण-कोण असतील? ते मुलांना काय शिकवतील? मुलांचा अभ्यासक्रम कसा असेल? शाळेची वेळ काय असेल? वर्ग कुठे भरतील? किती विद्यार्थी असतील? गणवेष असेल का? चाचण्या, परीक्षा आणि स्पर्धा असतील का? शाळेला सुट्याही लागतील का? असे जे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील त्यांचे निरसन करण्यासाठी व शाळेविषयी तुम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही 'मराठी शाळा पालक माहिती सत्र' ठेवले आहे. ह्यामधे वय वर्षे ५ ते १३ असलेल्या मुलांच्या पालकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

मराठी शाळा पालक माहिती सत्र:

दिनांकः शनिवार, १५ एप्रिल २०१७
वेळः  दुपारी ४ ते ५ पर्यंत
स्थळः ममंसिं ग्रंथालय वर्ग, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, १ मे चिन रोड, सिंगापूर - १४९२५३
जवळील एमआरटी: क्वीन्सटाऊन 

अधिक माहितीसाठी संपर्क करा, प्राजक्ती मार्कंडेय यांना +65-98282345 वर. 

भेटू या तर लवकरच !

सस्नेह,
कार्यकारिणी,
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software