• Home
  • MMS Marathi School Facilitators Briefing session & Auditions

MMS Marathi School Facilitators Briefing session & Auditions

  • Sat, April 22, 2017
  • 2:30 PM - 4:00 PM
  • GIIS Queenstown, 1 Mei Chin Road

Registration

  • You can attend this briefing session as a nonmember but to facilitate, you would have to take up MMS Membership.

Registration is closed

सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्र मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या 'हसत खेळत मराठी' या मराठी शाळा उपक्रमाबद्दल आपण ऐकले असेलच. आपल्या मंडळाचे ह्या आधीचे उपक्रम जसे अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहेत तसा 'मराठी शाळा' हाही उपक्रम तुमच्या मदतीने यशस्वीरित्या पुढे जाईल ह्याबद्दल मंडळाला खात्री आहे.

या शाळेत मुलांना मराठी बोलायला व वाचायला शिकवण्यावर भर असेल. मुलांना मराठी समजावे व त्याची गोडी लागावी या पद्धतीने ही शाळा चालेल. मुलांना शिकताना खूप धमाल यावी, शाळा ही शाळा न वाटता एक मजेचा अनुभव वाटावा असा उद्देश आहे. त्यामुळे या शाळेत शिकवण्यासाठी मराठी शिकवण्याचा अनुभव नसला तरी मराठी भाषेबद्दलची आत्मीयता, विषय सोपा व मजेशीर करून शिकवण्याचे तंत्र आणि मुलांमध्ये रस असणे गरजेचे आहे.

या शाळेसाठी शिक्षक म्हणून काम करण्याची तुमची इच्छा असल्यास येत्या शनिवारी दिनांक शनिवार, २२ एप्रिल २०१७ रोजी शाळेविषयी तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळावी ह्या उद्देशाने "मराठी शाळा शिक्षक माहिती सत्र" ठेवले आहे. शाळेची शिकवणी पद्धत काय असेल, वेळ - स्थळ काय असेल, तसेच तुमच्या कडून शिकवताना काय अपेक्षित आहे आणि काय नाही इत्यादी माहिती तुम्हाला आम्ही त्यात देऊ. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ व तुमची शाळेसाठी कधी व किती वेळ देण्याची तयारी आहे हे ही नोंदवून घेऊ.

शाळा सुरु झाल्यावर शिकवण्यासाठी सामग्री, गोष्टी गाणी, तक्ते - slides हे सर्व तुम्हाला तयार दिले जाईल. तुमची उपलब्धता विचारून तुमची शिकवण्याची पाळी ३-४ आठवडे आधी नक्की केली जाईल. तेव्हा या वर्षी तुम्हाला १-२ वर्ग जरी घेता येतील असे तुम्हाला वाटत असेल आणि मराठी शाळाउपक्रमाबद्दल तुम्हाला आत्मीयता व कळकळ वाटत असेल तर या सत्रासाठी नक्की या.

तसेच शिक्षकांनी ह्या दिवशी आपल्या छोट्या बालमित्रांचे जग ओळखून त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट तुम्ही वाचून किंवा उत्स्फूर्तपणे सादर करु शकता. वेळेची मर्यादा - साधारण ३-४ मिनिटे असेल.

मराठी शाळा शिक्षक माहिती सत्र
दिनांकः शनिवार २२ एप्रिल २०१७
वेळः दुपारी २:३० ते ४
स्थळः ममंसिं ग्रंथालय वर्ग, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, १ मे चीन रोड, सिंगापूर १४९२५३
जवळील एमआरटी: क्वीन्सटाऊन

या सत्रासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी लिहा marathishala@mmsingapore.org ला किंवा संपर्क करा नलिनी थिटे यांना ९२९५७००० वर.

सस्नेह,
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software