• Home
  • Swaragandha Vocal & Instruments Auditions for MMS Seniors 2017

Swaragandha Vocal & Instruments Auditions for MMS Seniors 2017

  • Sun, June 18, 2017
  • 5:30 PM - 8:00 PM
  • Global Indian International School, 1 Mei Chin Road, (S)149253

Registration


Registration is closed

नमस्कार,

मराठी माणूस जितका संगीतप्रेमी तितकाच कलागुणी. मंडळाची स्थापना झाल्यापासून आपल्याला जितका संगीतप्रेमींचा पाठिंबा लाभला आहे तसेच खूप गुणी कलाकार ही लाभले आहेत. स्वरगंध उपक्रमाअंतर्गत वर्षाच्या सुरुवातीला आपण एक निष्पक्ष निवड चाचणी घेतो. आपल्या जुन्या-जाणत्या गायक-वादक कलाकारांसोबत नवीन गायक-वादकांना आमच्या मैफिलींमधे समान संधी उपलब्ध करुन देता यावी आणि जास्तीत जास्त कलाकारांना स्वरगंध तर्फे व्यासपीठ मिळावे असा या चाचणीचा उद्देश असतो. या चाचणीमधून निवडलेल्या कलाकारांना वर्षभरात होणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी बोलावले जाते.

या वर्षीची निवड चाचणी लवकरच होते आहे. त्यासाठी आम्ही खालील कलाकारांना यामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आमंत्रित करत आहोत 
१. नवीन गायक ज्यांनी आत्तापर्यंत एकदाही निवड चाचणी दिलेली नाही - अशा कलाकारांनी नावनोंदणी करून, रेकॉर्डेड गाणी पाठवणे व प्रत्यक्ष चाचणीला येणे गरजेचे आहे. 
२. नवीन वादक ज्यांनी आत्तापर्यंत एकदाही निवड चाचणी दिलेली नाही - अशा कलाकारांनी नावनोंदणी करून प्रत्यक्ष चाचणीला येणे गरजेचे आहे. रेकॉर्डेड गाणी पाठवणे गरजेचे नाही.
३. ज्या गायकांनी व वादकांनी २०१६ मधे निवड चाचणी दिली होती - अशा कलाकारांनी फक्त नावनोंदणी करावी व या वर्षीची तुमची उपलब्धता आम्हाला कळवावी. जर तुम्ही नाव नोंदले नाहीत तर या वर्षी तुम्हाला स्वरगंध च्या कार्यक्रमात भाग घ्यायला जमणार नाही असे गृहीत धरले जाईल. 

गायकांच्या निवड चाचणीबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे -
१) गायकाचे वय १५ वर्षे पूर्ण असावे. १५ वर्षाखालील गायक वादकांसाठी वेगळी चाचणी घेण्यात येईल. त्यासाठी www.mmsingapore.org वर मुलांच्या निवड चाचणी साठी नाव नोंदणी करावी.
२) इच्छुक गायकांनी आपली नावे ११ जून २०१७ पर्यंत खाली नमूद केलेल्या संकेतस्थळी नोंदवावी.
३) नाव नोंदवून झाल्यानंतर गायकांनी कलाकारांनी आपल्या आवडीची ३ गाणी रेकॉर्ड करून ११ जून २०१७ पर्यंत https://form.jotform.me/71423291801449 वर पाठवावी.
४) गाण्याचा मुखडा धरुन अजून किमान एक कडवे पाठवावे. साथीला तानपुरा घेतला तर चालेल पण कराओके नको.
५) पाठवलेल्या गाण्यांच्या आधारे, परीक्षक काही कलाकारांना अंतिम निवड-चाचणीसाठी बोलवतील. १८ जून २०१७ रोजी प्रत्यक्ष अंतिम चाचणी GIIS क्वीन्सटाऊन येथे ५:३० वाजता घेतली जाईल. आपण आधी पाठवलेल्या ३ गाण्यांपैकी कुठलेही १ गाणे परीक्षक आपल्याला साथ संगतीसह सादर करायला सांगतील.

वादकांच्या निवड चाचणीबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे -
१) वादकाचे वय १५ वर्षे पूर्ण व वरील असावे.
२) इच्छुक वादकांनी आपली नावे ११ जून २०१७ पर्यंत नोंदवावी.
३) वादकांनी रेकॉर्डेड गाणी पाठवण्याची गरज नाही.
४) १८ जून २०१७ रोजी प्रत्यक्ष अंतिम चाचणी GIIS क्वीन्सटाऊन येथे ५:३० वाजता घेतली जाईल. वादकांनी स्वतः:ची वाद्ये घेऊन यावीत.
५) नाव नोंदवलेल्या सर्व वादकांना १५ जून २०१७ पर्यंत कुठल्या गाण्याला साथसंगत करायची आहे हे सांगण्यात येईल.

तेंव्हा मंडळी तयारीला लागा आणि ११ जून २०१७ च्या आत नोंदणी करा. काही प्रश्न असल्यास नलिनी थिटे यांच्याशी vicepresident@mmsingapore.org संपर्क साधा.

विशेष सूचना: 

  • निवड-चाचणीसाठी नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. 
  • नोंदणी केवळ सभासदांसाठीचं उपलब्ध आहे. 
  • नवीन सभासदत्व घेण्यासाठी वा नूतनीकरणासाठी www.mmsingapore.org/membership वर क्लिक करा।

सस्नेह,
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software