• Home
  • Swaragandha Vocal & Instruments Auditions for MMS Juniors 2017

Swaragandha Vocal & Instruments Auditions for MMS Juniors 2017

  • Sat, June 10, 2017
  • 11:55 PM
  • Video auditions only

Registration


Registration is closed
छोट्या दोस्तांनो, नमस्कार !

तुमची गोजिरवाणी चिवचिव, तुमचे वेल्हाळ शब्द यांच्यावर आम्ही मोठे लोक अगदी फिदा असतो. त्यात तुमचं सुरेल गाणं आम्हाला ऐकायला मिळालं किंवा एखादं वाद्य वाजवताना तुम्हाला बघता आलं तर क्या बात!!! ममंसिंच्या मुलांचे कलागुण सर्वांसमोर आणता येणे ही आमच्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट असते. म्हणूनच ह्यावर्षी स्वरगंध समितीने खास मुलांचा एक सांगीतिक कार्यक्रम येत्या गणेशोत्सवात आयोजित करायचे योजले आहे. त्यासाठीच्या निवड-चाचणीसाठी आम्ही सर्व मुलांना आम्ही आमंत्रित करीत आहोत.

निवड चाचणीबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे -

१) बालकलाकाराचे वय ८ ते १५ वयोगटातील असावे.

२) बालगायकांच्या निवड चाचणीसाठी २ गाणी (विडिओ) रेकॉर्ड करून आम्हाला पाठवायची आहेत. त्यापैकी, एक बालगीत असावे आणि दुसरं गाणं इतर कुठल्याही प्रकारचं चालेल. दोन्ही गाणी मराठी भाषेतील असावीत. मुखडा व पुढे एक कडवे एवढे रेकॉर्ड करून पाठवले तर पुरेसे आहे.

३) बालवादकांच्या निवड चाचणीसाठी निदान २ मिनिटांचे २ तुकडे विडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवायचे आहेत.

४) वेबसाईट वर नावनोंदणी केल्याशिवाय रेकॉर्ड केलेली गाणी पाठवू नयेत अशी नम्र विनंती. अशी गाणी निवड-चाचणीसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत.

५) नावनोंदणी झाल्यानंतरच, मुलांचे व्हिडिओ https://form.jotform.me/71420707701447 ह्या लिंकवर अपलोड करा.

६) गरज भासल्यास परीक्षक काही बालकलाकारांना आणखी एका चाचणीसाठी १७ जूनला येण्याची विनंती करतील. तसे त्यांना १३ जून २०१७ पर्यंत कळविण्यात येईल.

इच्छुक बालगायकांची व बालवादकांची नावे पालकांनी शनिवार १० जून २०१७ च्या आत ममंसिं वेबसाईट वर नोंदवावी व वर दिलेल्या संकेतस्थळावर १० जून पर्यंत व्हिडिओ अपलोड करावेत.

तेंव्हा छोट्या दोस्तांनो, तयारीला लागा आणि काही प्रश्न असल्यास नलिनी थिटे यांच्याशी ९२९५७००० वर संपर्क साधा.

विशेष सूचना:

१) निवड-चाचणीसाठी ममंसिं वेबसाईट वर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच व्हिडिओ अपलोड करणे ही गरजेचे आहे.

२) नोंदणी केवळ सभासदांसाठीच उपलब्ध आहे. जर मूल १२ वर्षाखालील असेल तर किमान एका पालकाचे सभासदत्व असणे गरजेचे आहे. १२ वर्ष पूर्ण व त्यापेक्षा मोठ्या मुलाचे स्वतःचे सभासदत्व लागेल.

३) नवीन सभासदत्व घेण्यासाठी वा नूतनीकरणासाठी www.mmsingapore.org/membership वर क्लिक करा.

सस्नेह,
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software