• Home
  • Inviting Ganapati Paintings by MMS Members

Inviting Ganapati Paintings by MMS Members

  • 17 Jul 2017
  • 10 Aug 2017
  • Online

Registration


Registration is closed

प्रिय ममंसिं सभासद हो, नमस्कार !

या वर्षी गणपती उत्सवानिमित्त ममंसिं एक गणपती व्हिडीओ निर्माण करत आहे. त्यामध्ये ममंसिं सभासद चित्रकारांच्या प्रतिभेला आम्ही संधी देऊ इच्छितो. तुमच्या स्वतःच्या गणपती पैंटिंग चा डिजिटल फोटो तुम्ही आम्हाला पाठवा. निवडक काही चित्रांना आम्ही या व्हिडीओ मध्ये समाविष्ट करून घेऊ. तुम्ही आमच्यासाठी खास नवीन कलाकृती तयार करणार असल्यास आम्हाला ती तयार होत असतानाचा time lapse व्हिडिओ पाठवलात तर अजूनच छान.

१. ही संधी फक्त ममंसिं सभासदांसाठी आहे. वयाची मर्यादा नाही. १२ वर्षाखालील कलाकारांच्या किमान एका पालकाचे ममंसिं सभासदत्व असणे गरजेचे आहे. तसेच १२ वर्षावरील कलाकारांचे स्वतःचे सभासदत्व असणे गरजेचे आहे.
२. एक कलाकार एका पेक्षा जास्त कलाकृती पाठवू शकतो. पण आम्ही त्यातील एखादी च वापरू शकू याची कृपया नोंद घ्यावी. कलाकृती तुमच्या shared drive वर टाकून त्याची high resolution download करता येईल अशी digital लिंक रजिस्टर करताना जोडणे आवश्यक आहे.
३. कलाकृती तुमची स्वतःची असावी. त्यावर तुमची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे.
४. कलाकृती विकलेली वा भेट देऊन टाकलेली नसावी. ती तुमच्या ताब्यात असावी व त्यावर तुमचा पूर्ण हक्क असावा. कलाकृतीची मूळ प्रत बघायला मागवण्यात येऊ शकते. तुम्ही नंतर ती प्रत विकू वा भेट देऊ शकता पण नवीन मालकास ममंसिं व्हिडीओ मध्ये या कलाकृतीच्या असण्याबद्दल आक्षेप नसणे गरजेचे आहे.
५. कलाकृतीला माध्यमाचे बंधन नाही. पण ती digitally तयार केलेली नसावी. हाताने काढलेले चित्र असावे.
६. गणपती व्हिडीओ मध्ये होणाऱ्या कलाकृतींची निवड ममंसिं कार्यकारिणी करेल.
७. तुमची कलाकृती आम्हाला पाठवण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट आहे.

आपली
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software