गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रावरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलयागजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!- कवयित्री शांता शेळके
कधी शब्दांशी हसत खेळत, कधी शब्दांवर स्वार होत, कधी काव्यातून सुरेख व्यक्त होत आपल्याला भाव भावनांची सहज सुंदर सफर घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत होती त्या मराठी साहित्यातील मात्तबर 'वागीश्वरीस ' अर्थात शांताबाई शेळके ह्यांना विनम्र अभिवादन. सहा दशके मराठी साहित्य क्षेत्राची अविरत सेवा करताना त्यांनी कविता संग्रह, कथा, कादंबरी, अनुवाद, ललित लेखन, स्तंभ लेखन, बालसाहित्य अशा अनेक विभागात लीलया संचार केला. येत्या गणेशोत्सवात 'जे जे उत्तम' ह्या कार्यक्रमात आम्ही बहुपेढी व्यक्तिमत्व शांताबाई शेळके ह्यांच्या निवडक साहित्याचे अभिवाचन करणार आहोत.
'जे जे उत्तम' ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती अशी आहे:
१) हा कार्यक्रम सोमवार दिनांक २८ ऑगस्ट २०१७ रोजी ग्लोबल इंडियन स्कूल, क्वीन्सटाऊन ह्या शाळेच्या 'ऑडियो-विजुअल रुम'मधे होणार आहे.
२) कार्यक्रम श्री गणरायाची आरती आणि प्रसादग्रहणानंतर रात्री ७:३० वाजता सुरु होईल.
३) कार्यक्रमाचा विषय आहे - लेखिका शांता शेळके ह्यांच्या साहित्याचे वाचन.
४) वाचनाची कालमर्यादा प्रत्येकी ५ ते ७ मिनिटे.
५) सहभागासाठी ममसिं सभासदत्व असणे गरजेचे.
६) 'जे जे उत्तम'ची निवडचाचणी रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०१७ रोजी असणार आहे. ही निवडचाचणी दुपारी २:३० वाजता ग्लोबल इंडियन स्कूल, क्वीन्सटाऊनच्या आवारात मराठी ग्रंथालयामधे होणार आहे.
सस्नेह, आपली कार्यकारिणीमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699