• Home
 • Invitation to enrol for "MMS Chingay Parade Performance 2018" participation

Invitation to enrol for "MMS Chingay Parade Performance 2018" participation

 • 10 Oct 2017
 • 26 Nov 2017
 • To be announced

Registration

 • If you are not a member, please take up membership at www.mmsingapore.org Membership taken now will be valid till Mar 2018.

Registration is closed

नमस्कार,

सिंगापूर मधील ‘ चिंगे परेड’ या अतिशय प्रतिष्ठित अशा शोभा यात्रेत महाराष्ट्र मंडळाने २०१७ साली दिमाखदार पदार्पण केले आणि आपल्या नृत्याविष्काराने सगळ्यांना मोहून टाकले. २०१८ साली होणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण आपल्याला मिळाले आहे ही आपल्या मंडळासाठी अभिमानाची गोष्ट आहे.  

या वेळेस देखील आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा ठसा नृत्याच्या रूपाने आपल्याला या कार्यक्रमात पाडता यावा यासाठी आम्ही नृत्यदिग्दर्शकांना तसेच नृत्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना आवाहन करीत आहोत.

‘Cultural Funtasy ‘ ही २०१८ सालच्या चिंगे परेड ची संकल्पना आहे. मंडळातर्फे लेझीम नृत्य करण्यात येणार आहे. लेझीम नृत्य बसवू शकणाऱ्या नृत्यदिग्दर्शकांना प्राधान्य दिले जाईल.

विशेष सूचना -

 • नृत्यदिग्दर्शकांनी आपले अर्ज feedback@mmsingapore.org इथे इमेल द्वारे १५ ऑक्टोबरपर्यंत पाठवावेत. नृत्य दिग्दर्शकांसाठी वय मर्यादा किमान २१ आहे.
 • १० वर्षावरील सर्वांसाठी नृत्यकलाकार नावनोंदणी खुली आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी ममंसिं वेबसाईट वर ३१ ऑक्टोबर पर्यंत नावनोंदणी करावी.
 • नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यकलाकार दोन्हीसाठी महाराष्ट्र मंडळाचे सदस्यत्व आवश्यक आहे. १२ वर्षावरील मुलांचे स्वत:चे तर त्याखालील मुलांच्या आईवडीलांपैकी एकाचे सदस्यत्व लागेल.
 • अंतिम निवडीचा निर्णय मंडळ कार्यकारिणी सदस्य घेतील.
 • नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यापासून सराव सुरु होतील. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये देखील सराव सुरु राहतील. डिसेंबर मध्ये सराव होणार नाही याची नोंद घ्यावी.
 • १०, २३ आणि २४ फेब्रुवारी २०१८ ह्या दिवशी final performances होणार आहेत. तसेच त्या आधी जानेवारी मधे venue rehearsals, dress reeharsals असतील. त्यांना आणि नोव्हेंबर जानेवारी मधील सर्व शनिवार रविवार तालमीसाठी येणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
आपली,
ममंसिं कार्यकारिणी

Powered by Wild Apricot Membership Software