• Home
  • MMS Maharashtra Din Foodie Fun Day - Food festival, Cooking Competition and Drawing Competition

MMS Maharashtra Din Foodie Fun Day - Food festival, Cooking Competition and Drawing Competition

  • Tue, May 01, 2018
  • 10:00 AM - 1:00 PM
  • Global Indian International School, 1 Mei Chin Road, S 149253

Registration

  • Stall fees 40$ + Refundable deposit 50$
  • Stall fees 20$ + Refundable deposit 50$
  • Stall fees 20$ + Refundable deposit 50$
  • Stall fees 20$ + Refundable deposit 50$

Registration is closed


सर्वांना सप्रेम नमस्कार!

सिंगापूर हे आपल्यापैकी बऱ्याच जणांची कर्मभूमी, काही जणांची अध्ययनभूमी तर काही जणांची स्थायीभूमी झाली आहे. पण आपल्या लाडक्या महाराष्ट्राची व “गर्जा महाराष्ट्र माझा” ह्या गौरव-गीताची आठवण करून द्यायला लवकरच महाराष्ट्र दिन येत आहे.

संपर्क, संवाद आणि सहवास या महाराष्ट्र मंडळाच्या त्रिवेणी-सूत्राशी निगडीत अशा पद्धतीने हा दिवस आपण साजरा करणार आहोत. गेल्या वर्षीच्या अनुभवावरूनच आनंदमेळावा हा आपल्या सर्वांना किती आवडतो हे माहित आहेच. तेव्हां तसाच आनंदमेळावा भरवण्यास सर्वांना आग्रहाचे सप्रेम आमंत्रण...!

या वर्षीच्या आनंदमेळाव्याची रूपरेषा खालील प्रमाणे:-

१. गेल्या वर्षी प्रमाणेच, निरनिराळ्या खाद्द्य पदार्थांचे स्टॉल आपण लावू शकता. वयोमर्यादा नाही पण नांव-नोंदणी आवश्यक आहे आणि पदार्थ खास महाराष्ट्राची पाककृती असावी.

२. स्टॉल खेळांचा, मेंदी, removable tattoo अशा गोष्टींचा असू शकतो. नोंदणी करणे आवश्यक आहे.

३. एका स्टॉल वर जास्तीत जास्त २ खाद्य पदार्थ अथवा १ खेळ अथवा एक सेवा ठेवावी. त्यापेक्षा जास्त काही ठरवू नये. तसेच नांव-नोंदणी करताना जो पदार्थ, खेळ वा सेवा तुम्ही ठरवली असेल त्यात बदल करु नये. बदल आढळल्यास कार्यक्रम-स्थळी स्टॉल लावायला कदाचित आपल्याला अनुमती मिळणार नाही किंवा आपली ठेव रक्कम परत केली जाणार नाही. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये ह्या हेतूने हा नियम ठेवला आहे. तुम्ही नोंदवलेला पदार्थ, सेवा किंवा खेळ दुसऱ्या कोणी तुमच्या आधी नोंदवली असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करून बदल सुचवू.

४. स्टॉल लावण्यासाठी मंडळाचे विद्द्यमान सभासदत्व असणे आवश्यक आहे. स्टॉल जर लहान मुले लावणार असतील (वय वर्षे १२ च्या खालील) तर पालकांपैकी किमान एकाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.

५. स्टॉलवर खेळ खेळण्यासाठी आपण जास्तीत जास्त १ डॉलर पर्यंत तिकीट आकारु शकता. खाद्यपदार्थ, टॅटू, मेंदी, नेल-आर्ट, बलून-स्कल्प्टिंग अशा सेवांसाठी ३ डॉलरपेक्षा जास्त तिकीट आकारु नये अशी विनंती. जर तशी गरज भासत असेल तर किमान ३ दिवस आधी आम्हाला संपर्क करुन कार्यक्रमापूर्वीच परवानगी घ्यावी.

६. मंडळाने नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांची एक स्पर्धासुद्धा ठेवली आहे. सर्वात नाविन्यपूर्ण, पौष्टिक, चविष्ट पण तितकाच हलका (healthy, nourishing, delicious) अशा पदार्थाला बक्षीस असेल. खाद्यपदार्थ खास मराठी वा महाराष्ट्राच्या विविध पाककृतींपैकी असणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थ घरून करून आणावा आणि कार्यक्रम-स्थळी आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करावा. त्याशेजारी पाककृतींबद्द्ल थोडी माहिती एका कागदावर लिहून ठेवावी. पाककृती केलेल्या व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित आहे. परीक्षक पदार्थाची चव घेऊन विजेते घोषित करतील. परिक्षण करताना वरिल निकषांना, व मांडणीतील कल्पकता व सजावट यांना महत्व दिले जाईल. या स्पर्धेचे परीक्षक असतील या क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ञ श्री.मिलिंद सोवनी. तुमच्या पदार्थांमधे सिंगापूरी-मराठी असा सुरेख संगम असेल तर परिक्षक अधिक मार्क देतील ही अपेक्षा आहे. अर्थात त्यांचा निर्णय अंतिम राहिल.

७. मंडळाने खाद्यपदार्थांच्या स्पर्धेप्रमाणेच चित्रकलेच्या स्पर्धेचेही आयोजन केले आहे. स्पर्धा १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी आहे व स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलांच्या पालकांपैकी किमान एकाने मंडळाचे विद्द्यमान सभासद असणे आवश्यक आहे. कार्यक्रम-स्थळी चित्रासाठी A3 आकारचे पांढरे कागद उपलब्ध असतील. स्पर्धकांनी कोरडे रंग (खडू वा पेन्सिली) आपल्या बरोबर घेऊन यावे. ओले रंग शक्यतो वापरू नयेत ही विनंती.

८. काही प्रश्न असतील तर भूषण गोरे यांना 97102845 ह्या नंबरवर मेसेज करा किंवा  feedback@mmsingapore.org ह्यावर ई-मेल पाठवा.

कार्यक्रमाचा तपशील व शुल्काची माहिती
दिनांकः मंगळवार, १ मे २०१८ (सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे)
स्थळः ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाऊन, मे-चिन रोड, सिंगापूर
वेळ: सकाळी ११ ते दुपारी १

आनंदमेळावा, चित्रकला स्पर्धा व नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ स्पर्धा प्रवेश विनाशुल्क आहे

खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे दर:
प्रौढांचे स्टॉल S$४०
१५ वर्षे वयापर्यंतच्या मुलांचे S$२०
तात्पुरती ठेव रक्कम (deposit) - सर्व S$५०*

इतर गोष्टींचे/सेवेचे स्टॉल:
सर्व स्टॉल - S$२०;
तात्पुरती ठेव रक्कम (deposit) S$५० *

कार्यक्रमाची रूपरेषा व वेळापत्रक
१०:०० ते ११:०० स्टॉल्सची नोंदणी व मांडणी, नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ मांडणी
१०:०० ते ११:३० चित्रकला स्पर्धा
११:०० ते १२:०० नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ स्पर्धा
११:०० ते १:०० खाद्यपदार्थांची विक्री व खेळ
१२:३० - बक्षीस वितरण

महत्वाची सूचना - * तात्पुरती ठेव रक्कम कार्यक्रमाच्या शेवटी परत केली जाईल. जर नोंदणी पेक्षा वेगळा स्टॉल लावला अथवा स्टॉलमुळे कार्यक्रम-स्थळी अस्वच्छता वा नुकसान झाल्यास ही ठेव रक्कम परत मिळणार नाही.

काही महत्वाचे नियम
1. स्टॉल ३ फूट बाय २ फूट टेबलावर मावेल असा असावा.
2. खेळ सुरक्षितता व स्वच्छता ह्यांचा विचार करुन ठरवलेले असावेत. तसेच, स्टॉलमुळे शाळेच्या मालमत्तेस हानी वा खेळणार्‍या व्यक्तीस इजा पोहोचणार नाही याची कृपया दक्षता. बाळगावी. शाळेच्या भिंतींवर काहीही चिकटवण्यास अनुमती नाही. तसेच वीजेचा पुरवठा वा विस्तव लागणारे खेळ सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करता, स्वीकारले जाणार नाहीत.
3. स्टॉलसाठी नावनोंदणी २९ एप्रिल पर्यंत ONLINE करणे आवश्यक आहे.​ आयत्या वेळी किंवा आदल्या दिवशी स्टॉल साठी विनंती स्विकारणे अवघड जाईल. आनंद मेळाव्यासाठी स्टॉल मर्यादित आहेत. तेव्हा लवकरात लवकर नावनोंदणी करुन आपले स्टॉल आरक्षित करा.
4. श्टॉलवर विकल्या जाणा-या खाद्यपदार्थांच्या दर्जाची, अधिकृततेची व त्यातून खाणा-यांवर होणा-या परिणामांची जबाबदारी संपुर्णपणे स्टॉल लावणा-या व्यक्ती किंवा (मुले असल्यास) त्यांच्या पालकांची राहील. मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. यासाठी मुख्य म्हणजे स्टॉल लावणाऱ्यांनी स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची अतिशय दक्षता घेंणे अत्यावश्यक आहे.
5. व्यापारी-स्तरावर विक्रीस सक्त मनाई आहे.
6. आपल्या लागणारी साधने – टेबल-क्लॉथ, disposable items, सुट्टे पैसे ईत्यादींची व्यवस्था आपण स्वत:च करायची आहे. Electrical points, outlets strictly cannot be used. E.g. please bring your own hot-cases, ice packs etc.
7. स्टॉल वर विक्रीसाठी आणलेले पदार्थ आणि स्पर्धेसाठी आणलेल पदार्थ वेगळे धरले जातील. स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या पदर्थांची विक्री होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला स्टॉल घेणे आवश्यक आहे. तेव्हां मंडळी, वरील सर्व मजकूर आणि नियम कृपया नीट स्मजून घ्या आणि त्वरा करा; आपली नांवे नोंदवा.

आपली स्नेहांकित,
कार्यकारिणी,
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software