• Home
  • MMS Marathi School Facilitators Briefing & Selection

MMS Marathi School Facilitators Briefing & Selection

  • Sun, April 29, 2018
  • 2:30 PM - 4:30 PM
  • GIIS, Queenstown, 1 Mei Chin Road

Registration

  • You can attend this briefing session as a nonmember but to facilitate, you would have to take up MMS Membership.

Registration is closed

सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्र मंडळाने मागील वर्षी (२०१७ मध्ये) सुरू केलेल्या 'हसत खेळत मराठी' या मराठी शाळा उपक्रमाबद्दल आपण ऐकले असेलच. ह्या उपक्रमाला २०१७ मधे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि स्वयंसेवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शाळेत मुलांना मराठी बोलायला व वाचायला शिकवण्यावर भर दिला जातो. मुलांना मराठीची गोडी लागावी या पद्धतीने ही शाळा चालते. त्यात नवीन गोष्ट म्हणजे, मंडळाने नुकताच भारती विद्यापीठ, पुणे यांच्या सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार भारती विद्यापीठ आपल्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, पुस्तके आणि परिक्षा प्रमाणपत्रे देणार आहे.

या शाळेसाठी शिक्षक म्हणून काम करण्याची तुमची इच्छा असल्यास पुढील रविवारी दिनांक २९ एप्रिल २०१८ रोजी शाळेविषयी तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळावी ह्या उद्देशाने "मराठी शाळा शिक्षक माहिती सत्र" ठेवले आहे. शाळेची शिकवणी पद्धत काय असेल, वेळ - स्थळ काय असेल, तसेच तुमच्या कडून शिकवताना काय अपेक्षित आहे आणि काय नाही इत्यादी माहिती तुम्हाला आम्ही त्यात देऊ. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ व तुमची शाळेसाठी कधी व किती वेळ देण्याची तयारी आहे हे ही नोंदवून घेऊ.

मुलांना शिकताना खूप धमाल यावी, शाळा ही शाळा न वाटता एक मजेचा अनुभव वाटावा हा मंडळाचा उद्देश कायम राहील. त्यामुळे या शाळेत शिकवण्यासाठी मराठी शिकवण्याचा अनुभव नसला तरी मराठी भाषेबद्दलची आत्मीयता, विषय सोपा व मजेशीर करून शिकवण्याचे तंत्र आणि मुलांमध्ये रस असणे गरजेचे आहे.

शाळा सुरु झाल्यावर शिकवण्यासाठी सामग्री, गोष्टी गाणी, तक्ते - slides हे सर्व तुम्हाला तयार दिले जाईल. तुमची उपलब्धता विचारून तुमची शिकवण्याची पाळी ३-४ आठवडे आधी नक्की केली जाईल. तेव्हा दर महिन्याला १ वर्ग घेता येईल असे तुम्हाला वाटत असेल तर या सत्रासाठी नक्की या.

शिक्षकांनी ह्या दिवशी आपल्या छोट्या बालमित्रांचे जग ओळखून त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट तुम्ही वाचून किंवा उत्स्फूर्तपणे सादर करु शकता. वेळेची मर्यादा - साधारण ३-४ मिनिटे असेल.

मराठी शाळा शिक्षक माहिती सत्र
दिनांकः रविवार २९ एप्रिल २०१८
वेळः दुपारी २:३० ते ४.३०
स्थळः ममंसिं ग्रंथालय वर्ग, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, १ मे चीन रोड, सिंगापूर १४९२५३
जवळील एमआरटी: क्वीन्सटाऊन

या सत्रासाठी नावनोंदणी करा - www.mmsingapore.org वर.
अधिक माहितीसाठी लिहा marathishala@mmsingapore.org ला।

सस्नेह,
कार्यकारिणी
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software