• Home
  • MMS Marathi Play - Acting Auditions and Backstage Help Registration - Kids Play and Adults Play

MMS Marathi Play - Acting Auditions and Backstage Help Registration - Kids Play and Adults Play

  • Sun, June 10, 2018
  • 2:00 PM - 4:00 PM
  • Global Indian International School, Queenstown Campus, 1 Mei Chin Rd

Registration

  • MMS membership necessary. Age limit 18 or above.
  • Kids above 12 need their own MMS membership. In case of Kids below 12, at least one of the parents needs to have a valid MMS membership. Open for kids between 8 and 17 years of age.
  • MMS Membership necessary. Age limit 21 or above.

Registration is closed
मराठी संस्कृतीमधला साहित्य, संगीत, कला याबरोबरचा महत्त्वाचा आणि आपल्या खास आवडीचा पैलू म्हणजे नाटक ! संगीत नाटकापासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंतची नाटकांची दुनिया आपल्याला नेहमीच भुरळ घालते. ममंसिं दर वर्षी सर्वांसमोर व्यावसायिक नाटकाच्या तोडीचे मराठी नाटक सादर करते. या वर्षीच्या नाटकाची देखिल प्रेक्षक आवर्जून वाट बघत आहेत. तेव्हा तयारीला लागायची वेळ आली आहे. मंडळाच्या नाटकाच्या गुणवत्तेचा चढता आलेख पहाता, त्यासाठी तितक्याच ताकदीच्या व झोकून काम करणा-या कलाकारांच्या आम्ही शोधात आहोत.

मोठ्यांचे नाटक आणि बालनाट्य दोन्हीची निवडचाचणी एकाच दिवशी आहे.

स्थळ : GIIS, क्वीन्सटाऊन, १ मे चिन रोड
दिवस : रविवार, १० जून २०१८
वेळ : दुपारी २ वाजता

नाटक मराठी आहे. त्यामुळे मराठी बोलण्यामधे सफाई हवी. तसेच निवड झाल्यास नाटकाच्या तालमींना जुलै ते अॉक्टोबर दर शनिवार व रविवार निम्मा दिवस द्यावा लागेल. नाटकाचा प्रयोग आॅक्टोबर महिन्यात असेल.

१. मोठ्यांची निवडफेरी

  • नावनोंदणी करणा-यांना निवडचाचणीचे स्क्रिप्ट ३ ते ५ दिवस आधी दिले जाईल.
  • भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद असणे गरजेचे.
  • वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण.
२. बालनाट्य निवडफेरी
  • वयोमर्यादा ८ ते १७ वर्षे पूर्ण.
  • १२ वर्षे पूर्ण असलेल्या मुलांचे स्वत:चे ममसिं सभासदत्व असणे गरजेचे.
  • १२ वर्षाखालील मुलांच्या किमान एका पालकाचे ममसिं सभासदत्व असणे गरजेचे.
  • निवडफेरीची आव्हानं
    • माझी आवड - तुम्हाला येणा-या कोणत्याही एका कलाप्रकारामधे आम्हाला काहीतरी करून दाखवा. नाट्यप्रवेश, नाच, गाणं देखिल चालेल. वेळ मर्यादा : १ मिनीट
    • आमची आवड - नावनोंदणी केलेल्यांना आम्ही दोन-तीन दिवसात एक उतारा पाठवू. तो तुम्ही आमच्यासमोर सादर करायचा आहे.
    • उत्स्फूर्त - आम्ही तुम्हाला आयत्या वेळी एखादी भावना किंवा परिस्थिती यानुसार अभिनय करायला सांगू.

३. बॅकस्टेज मदत

नृत्यदिग्दर्शन, संगीतदिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा, बॅकस्टेज यासाठी आम्हाला मदत लागणार आहे. तरी त्यामधे उत्सुक असलेल्यांनी नावनोंदणी करावी ही विनंती. निवडचाचणीसाठी येण्याची गरज नाही.

अधिक माहितीसाठी लीना +६५ ९६४३ ७१९२ / मीनल साटम +६५ ८८२० ९८३५ यांच्याशी WHATSAPP किंवा SMS द्वारे किंवा feedback@mmsingapore.org वर इमेल द्वारे संपर्क साधावा. 

नावनोंदणीची शेवटची तारीख ८ जून आहे. मंडळाच्या वेबसाईट वर नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

सस्नेह,
ममंसिं कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software