• Home
  • शब्दगंध - बाकीबाब - कवी बा.भ.बोरकर यांच्या काव्यनिर्मितीवर आधारीत कार्यक्रम

शब्दगंध - बाकीबाब - कवी बा.भ.बोरकर यांच्या काव्यनिर्मितीवर आधारीत कार्यक्रम

  • Sun, June 17, 2018
  • 5:00 PM
  • Function room 1, 61 Chua Chu Kang loop, Northvale condominium, S689668 (Opp Choa Chu Kang MRT station)

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed

सर्वांना सप्रेम नमस्कार!

महाराष्ट्र मंडळाचा शब्दगंध हा उपक्रम गेले अनेक वर्षे यशस्वी वाटचाल करीत आहे. आपले हौशी “शब्दगंधी” कवी स्वरचित मराठी कविता, कथा असे विविध साहित्य मासिक बैठकीत सादर करतात. येत्या जून महिन्यात रविवार दि.१७ रोजी शब्दगंधच्या या वेळच्या सत्रात एक खास कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

आपल्या सर्वांच्या जुन्या स्नेही, मंडळाच्या हितचिंतक आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ.माधवी वैद्द्य शब्दगंधला उपस्थित राहणार आहेत. आणि त्या आपल्यासाठी घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध मराठी/गोमांतक कवी कै.बा.भ.बोरकर यांच्या जीवनावर व त्यांच्या प्रगल्भ काव्यनिर्मितीवर आधारीत कार्यक्रम “बाकीबाब”. बोरकरांच्या काव्यमय आयुष्याचा मागोवा, त्यांच्या निवडक कवितांचे वाचन व बोरकरांच्या काही मोजक्या, अतिशय गेय पण कदाचित काहीशा कमी परिचित सुंदर काव्य-गीतांचे सादरीकरण असा हा कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमाचा तपशील:-

वेळ - रविवार, दिनांक १७ जून, सायं ५.०० वा

स्थळ - 61 Chua Chu Kang loop, Function Room 1, Northvale condominium, S689668

प्रवेश शुल्क (“लाईट” जेवणासहित) –
म.मं.सभासद, मुले : 
$५/- ,
पाहुणे/अभ्यागत : 
$१०/-
 

तर मंडळी, त्वरा करा आणि गुरूवार दि. १४ जूनच्या अगोदर मंडळाच्या संकेत-स्थळा द्वारे (म्हणजे website द्वारे) नांव-नोंदणी करा.

अधिक माहिती हवी असेल तर संपर्क:- श्री.संतोष अंबिके – ९७८२ ३०४४ किंवा नलिनी थिटे – ९२९५ ७०००

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software