सर्वांना सप्रेम नमस्कार!
आपणा सर्वांना ठाऊकच आहे की आपले महाराष्ट्र मंडळ विविध कलाप्रकारांना उत्तेजन देण्यासाठी, आपल्या सभासदांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला नेहमी उत्सूक असते. आपल्या वार्षिक कार्यक्रमांत विविधता आणि आविष्कारासोबत आपली कला-संस्कृती जपण्यावर कार्यकारिणीचे लक्ष केंद्रित असते. रागदारीवर आधारित संगीताला मराठी संगीत-नाटकांमधे खूप मोठे स्थान आहे. अनेक जुन्या संगीत नाटकांतील गीते आजच्या पिढीलाही परिचयाची आहेत. संगीताचे रितसर शिक्षण घेत असलेले कलाकार, तसेच प्रथितयश दिग्गज गायक सुद्धा, नाटकातील गीते/पदे आपल्या मैफिलींमधून नक्कीच सादर करतात; आपल्या गायन-कौशल्याचे / तालीम-मेहनतीचे दर्शन रसिकांना घडवतात.
कल्पना करा की, दिवाळीच्या आनंदसोहळ्यात जर नाटकातील पदे आणि आपल्या भारतीय संस्कृती मधील भरत-नाट्यम, कथ्थक यासारख्या अभिजात अशा नृत्य-कला-प्रकारांचा संगम झाला तर..! आणि तो देखिल आपल्या मंडळाच्या कलाकारांनी सादर केला तर..?
होय, मंडळाचा या वर्षीचा दिवाळीचा कार्यक्रम हा अशा संकल्पनेवर आधारित असेल. मराठी संगीत नाटकांतील गीते/पदे आणि त्याबरोबर नृत्य. हा कार्यक्रम यशस्वी करायला आपल्याला अर्थातच या क्षेत्रातील सुयोग्य सभासद-कलाकारांची निवड करायला लागणार आहे. त्यासाठी कार्यकारिणीने निवड-चाचण्यांची प्रक्रिया योजिली आहे. गायन, वादन (तबला, संवादिनी, अॉर्गन, मृदुंगम् व व्हायोलिन इत्यादि) आणि नृत्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात येतील. गायन वादनाची निवड चाचणी प्रत्यक्ष घेण्यात येईल तर नृत्याची निवड चाचणी विडिओ द्वारे घेण्यात येईल.
वादन– वादकाने तबला, संवादिनी, अॉर्गन, मृदुंगम किंवा व्हायोलिनची साथ-संगत गायकांना आयत्या वेळी करणे अपेक्षित आहे.
नृत्य– भरत नाट्यम / कथ्थक / कुचिपुडी मधे कमीतकमी तीन वर्षांचे शास्त्रीय शिक्षण घेतलेल्यांनी व १५ वर्षांवरील सभासद-कलाकारांनीच भाग घ्यावा. यापैकी आपल्या एका नृत्य कार्यक्रमाची ५ मिनिटाची चित्रफित (विडिओ क्लीप) आमच्याकडे पाठवावी. चित्रफित स्पष्ट व *.mp4, *.avi, *.wmv या फॉर्मॅट मधे असावी व कलाकाराने नृत्याच्या वेषभूषेत असणे आवश्यक आहे.
इतर तपशील:-
निवड समितीत ३ ते ४ परिक्षक असतील व त्यांचा निर्णय अंतिम राहील.
नावनोंदणी https://www.mmsingapore.org/event-2965212 येथे करावी.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699