• Home
  • Holi Mela 2019 - Festival Of Colours (FREE ENTRY)

Holi Mela 2019 - Festival Of Colours (FREE ENTRY)

  • Sat, March 23, 2019
  • 9:30 AM - 2:00 PM
  • Open field between Costa Rhu & Pebble Bay condo, 134, Tanjong Rhu Road, S 463920

Registration


Registration is closedनमस्कार मंडळी!


होळी रे होळी, पुरणाची पोळी; साहेबाच्या पोटात बंदूकीची गोळी ; सुटली रे पहा पंच-रंगांची मोळी !

कातोंग कम्युनिटी सेंटर, महाराष्ट्र मंडळ, गुजराती सोसायटी, सिंधी सोसायटी, मारवाडी मित्र मंडळ दरवर्षी होलीकोत्सव एकत्र साजरा करतात.. या वर्षी हा कार्यक्रम दि.२३ मार्च रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत आयोजित केला आहे.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून Member of Parliament Mr. Lim Biow Chuan आणि सिंगापूरमधील भारताचे उच्चायुक्त श्री.जावेद अश्रफ उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या सर्च सभासदांना आग्रहाचे आमंत्रण - आपला मोठ्या संख्येने सहभाग नक्की असेल ही अपेक्षा. ह्या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असतो - शिवाय सर्व मंडळांचे एक सादरीकरण व डी.जे. आहेच.

सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांबरोबर रंगपंचमीचा आनंद मस्त व सुरक्षितपणे घेता यावा म्हणून कार्यक्रमस्थळी खास रंगपंचमीचे शुद्ध नैसर्गिक रंग, विक्रीसाठी उपलब्ध असतील. आणि हो स्वादिष्ट, चमचमीत पदार्थांचा व जेवणाचा पेशवाईचा स्टॉल देखिल असेल.

या वर्षी एक अधिक आकर्षण म्हणजे Futsal Game (छोटा किंवा आटोपशीर फुटबॉल खेळ) स्पर्धा आयोजित होणार आहे. आपल्याला ह्यात खेळाडू म्हणून भाग घ्यायचा असेल तर खाली नमूद केलेल्या फोन वर नांव नोंदणी करा.
कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे:-

कार्यक्रम स्थळ - Tanjong Rhu Road, Open park between Costa Rhu and Pebble Bay, Nearest MRT - Stadium and bus no.11
वेळ - सकाळी ९:०० ते दुपारी २:००
प्रवेश विनामूल्य

कृपया आपल्याबरोबर रंग आणू नये, कार्यक्रम-स्थळी विक्री साठी उपलब्ध असलेल्या रंगांचाच उपयोग करावा ही विनंती, या बाबतीत सरकारचे नियम कडक आहेत व स्थानिक पोलीस या बाबत खबरदारी घेतील.

Futsal साठी नोंदणी व अधिक माहिती - श्री. प्रशांत वेदपाठक - 94675125 व संतोष अंबिके - 97823044

सोबत जोडलेल्या कार्यक्रम व FUTSAL ची पोस्टर आणि स्थळाचा नकाशा जरूर पहावा.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software