• Home
  • नाट्यरंग चाचणी - MMS Marathi Play - Acting Auditions and Backstage Help

नाट्यरंग चाचणी - MMS Marathi Play - Acting Auditions and Backstage Help

  • Sat, April 27, 2019
  • 2:00 PM - 6:00 PM
  • 18 Ewe Boon Road, #03-02, Singapore 259326

Registration

  • MMS membership necessary. Age limit - minimum 15 years completed as of 1st January 2019.
  • MMS Membership necessary. Age limit 21 or above.

सप्रेम नमस्कार!

संगीत आणि नाटक हा मराठी मनाचा जिव्हाळ्याचा विषय! अर्थात, आपण सर्व महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सभासद ह्याला अपवाद नाहीत. मंडळात नेहमी संगीत आणि नाटकांचे दर्जेदार कार्यक्रम सादर केले जातात. आपल्यातीलच उदयोन्मुख कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे. शिवाय यंदाच्या रौप्यमहोत्स्वी वर्षात काही खास कार्यक्रम करण्याचा मानस आपण बांधला आहे. मंडळाच्या ह्या वर्षी होणार्‍या नाटकांमध्ये (नाट्यरंग अंतर्गत) काम करण्यासाठी आम्ही कलाकार निवडणार आहोत.


१.      नाट्यरंग निवड चाचणीबद्दल अधिक माहिती:-

तारीख: शनिवार २७ एप्रिल २०१९ वेळ: दुपारी :०० ते सायंकाळी :००

स्थळ:   श्री.आशिष पुजारी यांचे घरी 18 Ewe Boon road, #03-02, Singapore 259326

संपर्क/Contact: Ashish Pujari – 92706100 or Sadanand Rajwade – 90886084

कृपया नांव नोंदणी गुरूवार २५ एप्रिलच्या आत करावी. Please register before Thu 25th April.

चाचणीचे स्वरूप:-

·            अभिनयाच्या निवडचाचणीसाठी त्या दिवशी स्क्रिप्ट दिली जाईल

·            भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद असणे आवश्यक आहे

·            वयोमर्यादा: किमान १५ वर्षे पूर्ण

·            निवडचाचणी अनुभवी परिक्षक घेतील

·           निवडचाचणीचा उद्देश हा सर्व सभासदांना (गुणवत्ता तयारीच्या आधारावर) मंडळाच्या नाटकांमधे समाविष्ट होण्यास समान संधी उपलब्ध व्हावी आणि जास्तीत जास्त कलाकारांना व्यासपीठ मिळावे असा आहे. या बाबतीत परिक्षकांचा आणि कार्यकारिणीचा निर्णय अंतिम राहील

२.      पडद्या मागे मदत (Backstage Help)

मंडळाला नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा, प्रकाश-योजना, संगीत पडद्यामागच्या तयारीसाठी (back-stage) देखिल आम्हाला खूप मदत लागणार आहे. तरी या सर्व कामांसाठी उत्सुक असलेल्यांनी नावनोंदणी करावी ही विनंती पण, निवडचाचणीसाठी येण्याची गरज नाही.

MMS requires support for property management, make-up, costumes, lighting, music and back-stage. If you have experience in these areas or are interested in providing such support, please do contact us however there is no need to attend the auditions.

सस्नेह,

आपली नम्र,

कार्यकारिणी, महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software