• Home
  • Music Auditions - स्वरगंध निवड चाचणी

Music Auditions - स्वरगंध निवड चाचणी

  • 05 May 2019
  • 00:30
  • 17 May 2019
  • 23:30
  • Online

Registration


Registration is closed


! स्वरगंध चाचणी !

सप्रेम नमस्कार! संगीत हा मराठी मनाचा जिव्हाळ्याचा विषय! अर्थात, आपण सर्व महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सभासद ह्याला अपवाद नाहीत. मंडळात नेहमी संगीताचे दर्जेदार कार्यक्रम सादर केले जातात. आपल्यातील गुणवान व उदयोन्मुख कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे. ह्यासाठी एक निवड-चाचणी घेण्यात येणार आहे.

स्वरगंध निवड चाचणीबद्दल अधिक माहिती:-

चाचणीचे स्वरूप:-

·            विभाग – मराठी भावगीत, मराठी भक्तीगीत/अभंग आणि मराठी सिनेगीत

·            वयोमर्यादा - नोंदणीच्या दिवशी १५ वर्षे पूर्ण

·            इच्छुक गायक/गायिकांनी आपली नांवे मंडळाच्या वेबसाईटवर बुधवार  १५ मे पर्यंत नोंदवावी

·            त्यानंतर कलाकारांनी आपल्या आवडीची मराठी गाणी MP3 format/फॉरमॅटमधे ध्वनीमुद्रित करून पाठवायची आहेत (फक्त मुखडा पुरेसा आहे). साथीला तानपुरा घेतला तर चालेल. एखाद्या गाण्याला तबल्याची साथ घेतली तर चालेल.

·            कृपया कराओके (karaoke) वापरू नका! Karaoke songs will be dis-regarded.

·            ध्वनीमुद्रित केलेली गाणी, WhatsApp द्वारे मिनल साटम – 88209835 किंवा संतोष अंबिके - 97823044 यांच्याकडे आपल्या पूर्ण नावासोबत बुधवार  १५ मे पर्यंत पाठवावी.

·            वेबसाईट्वर नोंदणी केल्याशिवाय ध्वनिमुद्रित (recorded) गाणी पाठवू नयेत ही नम्र विनंती!

·            पाठवलेल्या गाण्यांच्या आधारे, परीक्षक काही कलाकारांना अंतिम चाचणीसाठी निवडतील. निवडलेल्या कलाकारांना त्याप्रमाणे कळविण्यात येईल

·            वादन/Instrument accompanists – वयोमर्यादा/Age limit: नोंदणीच्या दिवशी १५ वर्षे पूर्ण

·            इच्छुक कलाकारांनी वाद्य-प्रकार व आपली नावे बुधवार  १५ मे पर्यंत वेबसाईट वर नोंदवावी. कलाकारांना कोणत्या गाण्याला साथ करायची आहे हे कळविण्यात येईल

स्वरगंध निवड चाचणीचा उद्देश हा सर्व सभासदांना (गुणवत्ता आणि तयारीच्या आधारावर) मंडळाच्या कार्यक्रमांमधे समाविष्ट होण्यास समान संधी उपलब्ध व्हावी आणि जास्तीत जास्त कलाकारांना व्यासपीठ मिळावे असा आहे. या चाचणीमधून निवडलेल्या कलाकारांना वर्षभरात होणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेता येऊ शकेल. निवडीच्या बाबतीत परिक्षकांचा आणि कार्यकारिणीचा निर्णय अंतिम राहील.

चाचणीसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केवळ मंडळाच्या सभासदांसाठीच उपलब्ध आहे.

सस्नेह, आपली नम्र,

कार्यकारिणी, महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software