नमस्कार
कोरोना वायरसच्या महासंकटामूळे बाहेर हिंडणे फिरणे, व्यायाम बंद पडला आहे का? सोशल डिस्टंसिन्ग राखता राखता आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे का?
ट्रेकर्स प्लस प्लस आपल्यासाठी घेऊन येत आहेत घरातल्या घरात सर्वांगसुंदर व्यायाम. झूम अँप चा उपयोग करून आमचे प्रशिक्षक आपल्याकडून कोणतेही उपकरण अथवा वजन न वापरता हसत खेळात व्यायाम करून घेतील. व्यायाम सुद्धा असे की तुम्हाला त्याचा शीण न येता तुमचा एक तास कसा जाईल ते तुमचं तुम्हाला च कळणार नाही.
कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नाही परंतु साधे व्यायाम करता येण्या एवढी तंदुरुस्ती आवश्यक आहे.
या वर्गात भाग घेण्यासाठी झूम अँप असलेला मोबाईल फोन, माणशी एक योग मॅट, पाण्याची बाटली आणि नॅपकिन आवश्यक आहे.
कृपया इच्छूक सभासदांनी नाव नोंदणी गुरुवार २३ एप्रिल पर्यंत करावी. नोंदणी केलेल्या सभासदांना Fitness Form भरावा लागेल आणि त्यांना आम्ही ZOOM ची link पण पाठवू.
आपली कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699