• Home
  • MMS पाककला स्पर्धा - CB Special

MMS पाककला स्पर्धा - CB Special

  • Fri, May 01, 2020
  • 1:00 PM
  • Online

Registration


Registration is closed


नमस्कार मंडळी,


दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आपल्या मंडळाने ‘१ मे - महाराष्ट्र दिनाच्या’ निमित्ताने पाककला स्पर्धा आयोजित करायचे ठरविले आहे. फक्त सध्यस्थिती बघता स्पर्धेच्या आखणीमध्ये थोडासा बदल केला आहे. सध्याच्या परिस्थितीत जेव्हा सर्व काही online आहे तेव्हा आपली पाककला स्पर्धा सुद्धा online असणार आहे. विषयही खूप खास आहे, circuit breaker मुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत नाही आहेत, तरीही आपण कमीत कमी साहित्यामध्ये एक छान पाककृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आवडला ना विषय?…

 “Circuit Breaker Special - जास्तीत जास्त ७ साहित्यात (7 Ingredients) बरोबर एक उत्तम पाककृती!!”  

 इच्छुक उमेदवारांनी खालील नियमांनुसार आपले व्हिडिओ मंडळाकडे लवकरात लवकर पाठवावेत . 

  1. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासदत्व आवश्यक आहे . 
  2. एक सभासद एकच पाककृती पाठवू शकतो. 
  3. पाककृती कितीही लांब असली तरीही विडिओ फक्त १० मिनिटांचा असावा अन्यथा उमेदवारी बाद करण्यात येईल. 
  4. पाककृती हि विषयाला धरून असावी, इतर पदार्थं ग्राह्य धरले जाणार नाहीत. 
  5. पाककृती शुद्ध शाकाहारी असावी. 
  6. साहित्याची यादी आणि कृती स्पष्ट लिहिलेली असावी. 
  7. व्हिडिओ बरोबर सभासदाने त्यांचे नाव, दूरध्वनी नंबर व ई-मेल नमूद करावा. 
  8. २७ एप्रिल पर्यंत आपले नाव नोंदवावे तसेच २९ एप्रिल सकाळी ९ वाजेपर्यंत खालील नंबरावर आपले व्हिडिओ पाठवावे. त्यानंतर आलेल्या entry बाद केल्या जातील. 
  9. विजेते स्पर्धक १ मे रोजी मंडळातर्फे घोषित केले जातील व त्यांचा व्हिडिओ मंडळाच्या फेसबुक वर प्रदर्शित होईल. 

तेजश्री दाते ९२७१६७६०

आशिष पुजारी ९२७०६१००

तर मंडळी, लवकरच आपले व्हिडिओ पाठवा. 

आपली कार्यकारिणी 




Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software