• Home
  • MMS Drawing Competition for children

MMS Drawing Competition for children

  • Fri, May 01, 2020
  • 11:00 AM - 1:00 PM
  • Google Meet / Hangouts

Registration

  • If registering for more than 1 child, please submit registrations individually.
  • If registering for more than 1 child, please submit registrations individually.

Registration is closed


नमस्कार मंडळी

प्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्व घरी सुरक्षित असाल ही अपेक्षा. पण काय मंडळी, हा “परिक्षेचा” काळ कधी एकदा संपेल असं वाटतंय नाही!? हा नविनच अनुभव आता पुरे असे वाटणं साहजिकच आहे.

मंडळाच्या कार्यकारिणीने या काळात बरेच उपक्रम सुरू केले आहेत. Google hangout, Zoom, Skype अशा संपर्क-साधानांचा सदुपयोग करून “म.मं.सिं नाट्यरंग”, “म.मं.सिं अरूण-तरूण” हे समूह पचंड यशस्वीपणे कार्यरत आहेत. नाट्यरंग ने नाट्य-वाचनाची ३ सदरे, प्रेक्षकांच्या भरघोस ’अप्रत्यक्ष’ हजेरीत केली....आपल्याला या समूहात सामील होऊन नाट्यवाचन किंवा केवळ श्रोते-प्रेक्षक म्हणून यायचे असेल तर श्री.आशिष पुजारी (9270 6100) यांच्याशी वॉट्स ॲप वर संपर्क करा. आपण मंडळाचे सभासद असणं आवश्यक आहे. तसेच, “अरूण-तरूण” समूहात सामिल व्हायला कु.वरूण अंबिके (9457 8128) याच्याशी वॉट्स ॲप वर संपर्क करावा - आपण १५ ते २५ वर्षे या वयोगटात असणे आणि सभासद असणे आवश्यक आहे. तसेच, मंडळाचा “म.मं.सिं. स्वरगंध” हा समूह देखिल स्थापन झाला आहे. यात समाविष्ट व्हायला श्री.आशिष पुजारी किंवा श्री.संतोष अंबिके (97823044) यांना वॉट्स ॲप संदेश पाठवा.

आता मंडळाच्या छोट्या सभासदांसाठी खास

मंडळाच्या छोट्या सभासदांची वेगळीच पंचाईत झाली आहे ना...? शाळेला बुट्टी मारायची मजा आता केव्हांच विरघळून गेली आणि सारखा, “आई, अगं कधी जायचं?” हा प्रश्न असेल! तुमच्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मंडळ एक चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित करीत आहे. कार्यशाळा Google Meet द्वारे आयोजित होईल आणि नोंदणी केलेल्या छोट्या सभासदांना (म्हणजे खरंतर त्यांच्या) आई / बाबांना कळवण्यात येईल. कार्यशाळा सौ. संध्या शेटे घेणार आहेत. बरं का मुलांनो, संध्या मावशी चित्रकलाकार तर आहेच, पण शिक्षिका, म्हणजे Teacher पण आहे....तेव्हां शाळेत गेल्याचा मस्त भास होईल...! पुढे काय करायचे??

वयोगट ५ ते ८ वर्षे:

  • “माझा ठसा” - पाण्याचे रंग वापरून (water-colour) आपल्या हाताच्या पुर्ण उघडलेल्या पंजाचा (palm), A4 शुभ्र कागदावर छान रंगबिरंगी ठसा उमटवायचा .....किंवा........
  •  “ताज्याची मजा” A4 शुभ्र कागदावर पाण्याचे रंग वापरून एखाद्या ताज्या भाजीचे रंगबिरंगी ठसे काढायचे (वांगी, ढब्बू-मिरची, टोमाटो)

वयोगट ९ ते १२ वर्षे:

  •   भेसळ-मिसळ” - एक मस्तपैकी टी-शर्ट painting बनवायचे (Live session मध्ये आपण A4 पेपर वर चित्र काढणार आहोत)
  •  “लांबच्या प्रवासातील पहिले पाऊल” – A4 शुभ्र कागद वापरून एक छान पैकी भेट-कार्ड (Greeting card) बनवायचे

मग १ मे या दिवशी सकाळी ११:०० वाजता संध्या मावशीच्या “वर्गात” हजर व्हायचे असेल तर ३० एप्रिल पर्यंत नक्की Register करा. 

या कार्यशाळेत आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलं (सह-सभासद, associate member)किंवा मुलांचे एक पालक (आई किंवा बाबा तरी) सभासद (member)असणे गरजेचे आहे. नांव नोंदणी करण्यासाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्या आणि आपले/आपल्या पाल्याचे नांच नोंदवा.

आपली कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software