• Home
  • NLB Read For Books - म. मं. सिं. साहित्य-सहवास - Session 2

NLB Read For Books - म. मं. सिं. साहित्य-सहवास - Session 2

  • Sun, July 26, 2020
  • 2:00 PM - 5:00 PM
  • Online
  • 0

Registration


Registration is closed
नमस्कार मंडळी

साहित्याची रुची नसलेला मराठी विरळा. मराठी साहित्यप्रेमींची ही साहित्याबद्दलची असलेली आवड जोपासायला आणि वृद्धिंगत करायला आम्ही सुरु करत आहोत एक नवीन उपक्रम - म. मं. सिं. साहित्य सहवास.

ह्या उपक्रमांतर्गत आपण लेख, कथा, कविता अशा विविध साहित्यप्रकारांचा आस्वाद घेणार आहोत. यात स्वरचित आणि प्रसिद्ध व प्रतिथयश लेखकांचे साहित्य सादर करण्याची संधी मिळेल. महिन्यातून एका रविवारी दुपारी २.३० ते ४ ह्या वेळेत आपण zoom meeting द्वारा online भेटू. साहित्य सहवास च्या WhatsApp ग्रुप मध्ये सामिल होण्यास अस्मिता तडवळकर यांच्याशी ८१६८६१४२ वर संपर्क साधा.

ह्या उपक्रमाचा श्रीगणेशा आपण एका अभिनव पद्धतीने National Library Board (NLB) च्या Read For Books कार्यक्रमात सहभाग घेऊन करणार आहोत. ह्या कार्यक्रमाद्वारे १० लोकांनी प्रत्येकी १५ मिनिटे वाचन केलं तर NLB, एक पुस्तक निवडक लाभार्थींना दान करणार आहे. NLBचा १००० पुस्तकं दान करण्याचा मानस आहे. आपण त्याला आपल्या परीने हातभार लावण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत.

दिनांक - रविवार,  २६ जुलै
वेळ - दुपारी २ 
वा
विषय - स्वरचित लेख/कथा किंवा दिवंगत प्रसिद्ध मराठी लेखक श्री. रत्नाकर मतकरी ह्यांचे साहित्य
  • वाचन मराठीत करावे
  • वाचण्यासाठी दिलेला अवधी - १५ मिनिटे
  • मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे
  • नाव नोंदवण्याची शेवटची तारीख - जुलै 

मतकरींचे साहित्य तुमच्याकडे नसेल तर, त्यासंदर्भात मंडळाशी संपर्क साधल्यास मदत करण्याचा प्रयत्न मंडळ करेल. अधिक माहिती साठी feedback@mmsingapore.org ला ई-मेल करा किंवा अस्मिता तडवळकर यांच्याशी ८१६८६१४२ वर संपर्क साधा.

सिंगापूरच्या वाचन मोहिमेस मराठी हातभार लावू या ! मतकरींना ही आपली छोटीशी श्रद्धांजली देखील ठरेल. 

१० च जागा असल्याने त्वरित नाव नोंदणी करावी ही विनंती.

साहित्यात रुची असणारे सगळे जण म. मं. सिं. पेज वरून फेसबुक लाईव्ह द्वारे या वाचनाचा आनंद घेऊ शकतात 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software