• Home
  • MMS Ganeshotsav 2020 - VividhaGunadarshan : Inviting Entries

MMS Ganeshotsav 2020 - VividhaGunadarshan : Inviting Entries

  • Sat, August 22, 2020
  • 4:00 PM - 6:00 PM
  • Online
  • 68

Registration

  • Please register the team leader first - a performing member or non-performing lead. Team leader will be the point of contact for your group.

    Then click "ADD GUEST" and add each performing member one by one. The guest details have to be the performing person's details. If it is a child below 12, please mention the child's name but email address and phone number should be that of the Member Parent. The email address will be used to verify the membership of the performing child/parent.

Registration is closed

नमस्कार मंडळी,

हे वर्ष खऱ्या अर्थाने अनोखे वर्ष आहे. त्यामुळे यंदा आपण आपला अतिशय आवडता गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. त्यातील आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम, विविध गुणदर्शन२२ ऑगस्ट २०२० रोजी करण्याचा मंडळाचा मानस आहे. सध्याची परिस्थिती आणि नियमांमुळे या वर्षीचा कार्यक्रम प्रत्यक्ष स्टेज वर न होता ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात येईल.

या वर्षीचा विषय आहे महाराष्ट्र माझा. आपल्या लाडक्या महाराष्ट्राबद्द्ल भावलेलं कुठलंही वैशिष्ट्य किंवा विविधता तुम्ही नृत्यातून, संगीतातून आणि अभिनयातून दर्शवू शकता. यावर्षी सर्किट ब्रेकरच्या नियमांमुळे आपण सोलो सादरीकरण समाविष्ट करणार आहोत. सभासद सोलो किंवा ग्रुप कार्यक्रम सादर करू शकतात.

सहभागाचे नियम :

  • कार्यक्रम मराठीत असावा.
  • सहभागासाठी मंडळाचे सभासदत्व अनिवार्य आहे.
  • कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किमान वयोमर्यादा ५ वर्ष आहे.
  • ५ ते १२ वर्षांमधील मुलांच्या सहभागासाठी किमान एका पालकाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.
  • १२ वर्षांवरील मुलांच्या सहभागासाठी त्यांचे स्वतःचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.
  • एका सभासदाला एकाच कार्यक्रमात सहभागी होता येईल.
  • सोलो कार्यक्रमाची वेळ मर्यादा जास्तीत जास्त २ मिनिटाची आहे.
  • ग्रुप कार्यक्रमाची वेळ मर्यादा जास्तीत जास्त ५ मिनिटाची आहे.
  • सहभागी कलाकारांनी पूर्ण कार्यक्रमाचा विडियो रेकॉर्ड करून मंडळाकडे पाठवायचा आहे.
  • ग्रुप कार्यक्रमातील कलाकारांनी एकत्र येऊन विडिओ रेकॉर्ड करावा अथवा स्वतःचा वैयक्तिक विडिओ तयार करून ग्रुप प्रमाणे merge करून मंडळाकडे पाठवावा. हे सर्व circuit breaker चे नियम पाळून करावे.
  • तुमच्या निवडलेल्या कार्यक्रमाला नाकारण्याचा हक्क मंडळाकडे राहील.
  • प्रत्येक ग्रुप ने एका सभासदास ग्रुपचा प्रवक्ता म्हणून नियोजित करावे व तसे नाव नोंदणी करताना लिहावे. मंडळ तुमच्या ग्रुप बरोबर तुमच्या प्रवक्त्यामार्फत संपर्कात राहील.

नावनोंदणीची शेवटची तारीख २५ जुलै २०२० आहे. नावनोंदणीच्या वेळी तुमच्या कार्यक्रमाची गाणी आणि साधारण आराखडा द्यावा. दोन कार्यक्रमात सारखी गाणी आल्यास प्रथम नोंदणी केलेल्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येईल.

तुमचा फायनल विडिओ आमच्याकडे १५ ऑगस्ट पर्यंत पोचावा.

अधिक माहितीसाठी मयुरा गोरे यांना +65 9030 2874 वर व्हाट्सऍप किंवा feedback@mmsingapore.org ला ई-मेल द्वारे संपर्क करा.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software