• About Us
  • म.मं.सिं. गणेशोत्सव २०२० - दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ आवाहन

म.मं.सिं. गणेशोत्सव २०२० - दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ आवाहन

  • Mon, July 27, 2020
  • 11:59 PM
  • Online

Registration


Registration is closed
रंगदेवतेला आणि रसिक प्रेक्षकांना सहर्ष अभिवादन करून येत्या गणेशोत्सवात महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे एक आगळा-वेगळा, मस्त, भन्नाट, युनिक नाट्य-गुच्छ !

दूरदर्शनवरील गजरा कार्यक्रम बहुतेक जणांना आठवतच असेल, त्या प्रकारच्या ३ ते ५ मिनिटांच्या ७ ते ८ छोट्या नाटूकल्यांचा समावेश या कार्यक्रमात आम्ही करणार आहोत. कोव्हीड-१९ चे सावट जरी असले तरी काय झाले? आपला उत्साह आणि सर्जनशीलता कमी नाही. या कल्पनेने नेहमीपेक्षा जास्त कलाकारांना यात सहभागी होता येईल.

मस्त आहे ना कल्पना? त्यासाठी आम्हाला लागणार आहेत दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ.

नाटुकली, दिग्दर्शक व कलाकार निवडीचा हक्क सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंडळाकडे राहील. दिलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना घेऊन दिग्दर्शकाला अडीच आठवड्यात हे नाटुकले बसवायचे आहे. ते आपण गणपतीत मंडळाच्या फेसबुक पेजवर ब्रॉडकास्ट करू.  

नावनोंदणीची मुदत सोमवार २७ जुलै २०२० पर्यंत आहे. आणि मंडळाचे सदस्यत्व गरजेचे आहे. वेळ थोडा असल्याने इच्छुकांनी त्वरा करा आणि रजिस्टर, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा !

अधिक माहितीसाठी लिहा नलिनी थिटे यांना +६५-९२९५७००० वर किंवा pro@mmsingapore.org वर.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software