• Home
  • Inviting entries for जे जे उत्तम - सामान्यांतले असामान्य - म. मं. सिं. गणेशोत्सव २०२०

Inviting entries for जे जे उत्तम - सामान्यांतले असामान्य - म. मं. सिं. गणेशोत्सव २०२०

  • 24 Aug 2020
  • 07:30
  • Online - Zoom - FB Live
  • 3

Registration


Registration is closed

सामान्यांतले असामान्य !

परवाच एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती. हैदराबादचे मोहम्मद नूर उद्दीन - जे गेली ३३ वर्षं इंग्रजी नीट येत नसल्याने दहावीची परीक्षा नापास होत होते - ते शेवटी वयाच्या ५१ व्या वर्षी दहावी पास झाले. इथेतिथे मोलमजुरी करून जगणाऱ्या नूर उद्दीन ह्यांना गरिबीमुळे इंग्रजीची शिकवणी वगैरे लावणं शक्य नव्हतं, पण आपण दहावी पास झालो तर आणखी चांगली नोकरी लागून कुटुंबाची काळजी घेता येईल म्हणून त्यांनी नेटाने स्वतःच स्वतःला थोडं थोडं इंग्रजी शिकवत ठेवलं आणि अखेर परीक्षेत यश मिळवून दाखवलं!

सामान्य असूनही 'ठेविले अनंते तैसेचि' न राहता असा असामान्य विचार, परिश्रम, आणि कलात्मकतेने आपल्याला स्फूर्ती देणारे लोक, प्रसंग, आणि घटना विषद करणारे साहित्य हा यंदाच्या 'जे जे उत्तम' चा विषय आहे. कार्यक्रम zoom द्वारे २४ ऑगस्ट ला live प्रेक्षपित करण्यात येईल.

सूचना:

  • पूर्व-प्रकाशित किंवा स्वानुभवाचा आधार असलेलं स्वरचित साहित्य आपण सादर करू शकता.
  • वाचनाची लांबी साधारण ५-८ मिनिटं इतकी असावी.
  • ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे जरुरी आहे.
  • नाव नोंदवण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे.
  • तुमच्या लिखाणाची एक प्रत secretary@mmsingapore.org वर १६ ऑगस्ट पर्यंत पाठवावी

अधिक माहितीसाठी अस्मिता तडवळकर (81686142) यांच्याशी संपर्क साधावा.

सस्नेह
- म. मं. सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software