• Home
  • चला बनवू इको फ्रेंडली गणपती मूर्ती - MMS Eco-Friendly Clay Ganesh Idol Making Workshop

चला बनवू इको फ्रेंडली गणपती मूर्ती - MMS Eco-Friendly Clay Ganesh Idol Making Workshop

  • Sun, August 16, 2020
  • 11:00 AM - 1:00 PM
  • Online on ZOOM
  • 5

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी आणि विशेषतः तरुण मित्र मंडळी,

यावर्षी गणेशोत्सवाप्रित्यर्थ महाराष्ट्र मंडळ सिंगापूर "चला बनवू इको फ्रेंडली गणपती मूर्ती" हा छोटासा उपक्रम आयोजित करीत आहे. हे छोटेसे वर्कशॉप मंडळाच्या सदस्य वर्षा पाटील ह्या zoom द्वारे ऑनलाईन घेणार आहेत. या वर्कशॉप मध्ये आपणास श्रींची प्रतिकृती बनविण्यास शिकता येईल.

अशा प्रकारे केलेली मूर्ती पाण्यात सहज विरघळते. त्याची प्रतिष्ठापना ही होऊ शकते. पण तुमच्या मातीकामाच्या कौशल्यावर मूर्तीचा टिकाऊपणा अवलंबून असल्याने प्रतिष्ठापनेचा निर्णय तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही घ्यावा अशी तुम्हाला विनंती.

ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी मंडळाच्या संकेतस्थळी आपली नावे दिनांक १४ ऑगस्ट पर्यंत नोंदवावी. अधिक माहितीसाठी भूषण साटम (९३८५७०५३) यांच्याशी संपर्क साधावा.

तारीख: रविवार १६ ऑगस्ट २०२०
वेळ    : सकाळी ११ ते दुपारी १

साहित्य:

  • क्ले सॉईल (Tanahqu Pure Natural Soil) - १ किलो
    • ५०० ग्राम मध्ये साधारण ४ ते ६ इंची गणपती तयार होतो. थोडी जास्त माती असल्यास, चूक झाल्यास दुसरी मूर्ती करण्यास उरलेली माती उपयोगी येईल.
    • Available at ArtFriend.
  • मेटलची पट्टी
  • रुंद चमचा (spatula)
  • लाकडी दात कोरणी (toothpick)
  • क्ले टूल्स असल्यास बरे. पण सक्ती नाही.

कार्यशाळेच्या अटी खालील प्रमाणे:

  • महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सदस्यत्व असणे गरजेचे.
  • लहान मुलांसोबत किमान एका पालकाने उपस्थित राहावे.
  • वर्कशॉपला लागणारे साहित्य सभासदाने स्वतः आणावयाचे आहे.
  • एका घरातून एक नावनोंदणी पुरेशी आहे.

सस्नेह,
- म. मं. सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software