• Home
 • मोदक स्पर्धा २०२० - Modak competition 2020

मोदक स्पर्धा २०२० - Modak competition 2020

 • Sun, August 23, 2020
 • 10:45 AM
 • Global Indian International School (GIIS) SMART Campus, 27 Punggol Field Walk, Singapore 828649

Registration

नमस्कार मंडळी,

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांत सुरू होत आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की आठवतो श्रींचा आवडता पदार्थ, मोदक. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, पेढ्याचे मोदक, सारणात वेगवेगळे प्रकार तसेच मुरडीत व कळ्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असे बरेच काही या एका शब्दाने आपल्या डोळ्यासमोरून तरळून जाते. आपण राहतो त्या साऊथ ईस्ट आशियाला पण मोदकाचे वावडे नाही. pau, onde onde, kueh, steamed buns यांना चिनी, मलय, जपानी - सर्व संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. तुम्ही पण वेगवेगळे मोदकाचे प्रकार गेले खूप वर्ष करून पहिले असतील. काही एकदम ठेवणीतल्या पाककृती असतील तर काही तुमची fusion versions असतील. या वर्षी तुमच्या मोदक-कृतींना आपण मंडळाच्या मंचावर आणू या? कशी वाटते कल्पना?

चला तर मग, ह्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र मंडळ सिंगापूरमध्ये भाग घ्या या अनोख्या आगळ्या वेगळ्या मोदक स्पर्धेत. या स्पर्धेसाठी आपल्याला परीक्षक लाभले आहेत, सुप्रसिद्ध मिशेलिन स्टार शेफ श्री मंजुनाथ मुरळ.

स्पर्धेची तारीख आणि वेळ : दि २३ ऑगस्ट सकाळी ११ वाजता.

स्थळ : GIIS पुंगोल

स्पर्धेचे नियम:

 • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आणि महाराष्ट्र मंडळाचे सभासदत्व असणे गरजेचे आहे.
 • नाव नोंदणीची शेवटची तारीख २० ऑगस्टआहे.
 • स्पर्धेची संकल्पना "अनोखा मोदक" अशी आहे. नेहेमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या मोदकांना प्राधान्य देण्यात येईल.
 • स्पर्धेसाठी ५ मोदक आणावे. जास्त आणू नयेत तसेच स्पर्धेनंतर ते कोणाला खायला देऊ नयेत. मोदक करताना, ते आणताना तसेच स्पर्धेच्या ठिकाणी त्याची मांडणी करताना स्वच्छता, कोविड१९ बाबतीतली सर्व सुरक्षा बाळगावी.
 • तयार मोदकांसहित स्पर्धेच्या 15 मिनिटे आधी उपस्थिती अपेक्षित आहे.
 • मोदक बनविताना त्याचा एक छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवावा. त्यात तुम्ही मोदक बनवतानाचे महत्त्वाचे टप्पे, मुद्दे रेकॉर्ड करू शकता. किंवा तुमच्या त्या रेसिपीमागच्या काही खास आठवणी सांगू शकता. मराठीतून सांगितल्यास छान पण इंग्लिश देखील चालेल. स्पर्धेच्या दिवशी तो विडिओ मंडळाला तुम्ही पाठवणे अपेक्षित आहे. सकाळच्या मोदक करण्याच्या गडबडीत जमले नाही तर स्पर्धेनंतर दुपारी पाठवला तरी चालेल.
 • मोदकांच्या चवी बरोबर, सादरीकरण, सजावट, संकल्पनेला अनुसरून आहे का नाही ह्याही बाबींची दखल घेतली जाईल.
 • विजेत्यांच्या निवडीबाबत मंडळाचा आणि परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी मोदक बनविण्याच्या प्रक्रियेचा छोटासा व्हिडिओ बनवून पाठवणे अपेक्षित आहे, पहिल्या ३ विजेत्या स्पर्धकांची नावे आणि व्हिडिओ मंडळाच्या फेसबुकवर पानावर पोस्ट करण्यात येईल.

ज्यांना ह्या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपली नावे मंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावी. अधिक माहिती साठी भूषण साटम (९३८५७०५३) यांच्याशी संपर्क साधावा.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software