• Home
  • साहित्य सहवास - पावसाच्या कविता - वाचन सहभागासाठी निमंत्रण

साहित्य सहवास - पावसाच्या कविता - वाचन सहभागासाठी निमंत्रण

  • 27 Sep 2020
  • 19:30
  • Online

Registration

दिवसभर आकाशात सूर्य तळपत असतो, घामाने अंग भिजून निघत असते, जीव थंड हवेसाठी आणि वाऱ्याच्या एका हलक्या झुळुकीसाठी आसुसलेला असतो... इतक्यात किलकिल्या डोळ्यांना झाडांमागून, इमारतींमागून एक करडी चादर आभाळ झाकत येताना दिसते... अचानक विजेचे लोळ चमकतात अन् भवताल गडगडून हसतो ! सिंगापूरकरांना कितीही वेळा अनुभवलं तरी नव्याने भेटणारं हे सुख म्हणजे पावसाचा आनंदोत्सव !

साहित्य सहवासच्या पुढच्या बैठकीचा विषय खास कवीमनाच्या आवडीचा.. पावसाच्या कवितांचा... ही बैठक आपण करत आहोत २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता. तेव्हा तुम्ही लिहिलेल्या पावसाच्या कविता बाहेर काढा. तयार नसतील तर लेखण्या बाहेर काढा आणि एखादी मस्त कविता लिहाच. सध्या वातावरण ही अनुकूल आहे. पावसाची कवीमनाला साथ आहे. ते ही शक्य नसेल तरी काहीच हरकत नाही. एखाद्या प्रतिथयश कवीची एखादी रुचलेली भावलेली छान कविता शोधून ठेवा. 

कार्यक्रम FB LIVE केला जाईल.

  • वाचनाचा अवधी ३ मिनिटापेक्षा जास्त नसावा.
  • एका सहभाग्याने एकच कविता वाचावी.
  • ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे जरुरी आहे.
  • नाव नोंदवण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर आहे. 
  • तसेच तुमच्या कवितेचे एक कच्चे ऑडिओ रेकॉर्डिंग २२ सप्टेंबर पर्यंत अस्मिता तडवळकर यांना व्हाट्सऍपने (+65-81686142) पाठवणे गरजेचे आहे.
  • तुमचे वाचनसाहित्य बदलायला सांगायचा अथवा नाकारायचा हक्क मंडळाकडे राहील.

अधिक माहितीसाठी अस्मिता तडवळकर (+65-81686142) यांच्याशी संपर्क साधावा.

सस्नेह,
- म. मं. सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software