• Home
  • लॉकडाउनच्या पोळ्या - महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती

लॉकडाउनच्या पोळ्या - महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती

  • Sat, September 26, 2020
  • 8:00 PM
  • Online on ZOOM

Registration

  • Please do one registration per device through which you plan to watch. If you are watching together on one device in one household, one registration would suffice. If you are going to watch on different devices, register separately.

Registration is closed


कोविडोत्तर जगात अनेक संस्थांनी / कलाकारांनी online माध्यमातून आपली कला जगासमोर आणली. महाराष्ट्र मंडळ याला अपवाद नाही. म.मं.सिं. नाट्यरंग उपक्रमांतर्गत गणेशोत्सवानिमित्त circuit breaker चे नियम पाळून केलेला हलकं-फुलकं कार्यक्रम आपण पाहीला असेलच. (नसेल पाहीला तर म.मं.सिं.च्या youtube चॅनेलवर जाऊन तो अजूनही पाहू शकता.)

पण ही सादर केली गेलेली नाटकं कोविडपूर्व काळातील होती, त्या काळासाठी लिहीलेली. आता कोविडोत्तर नाटकांमधे बदलत्या काळाचं प्रतिबिंब पडणारच की! म.मं.सिं.चे कलाकार तरी यात मागे कसे असतील?

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करीत आहे, लॉकडाऊनमधील लॉक्ड डाऊन लोकांची लॉक डाऊन वरची एकांकिका. खास Online सादरीकरणासाठी लिहीलेली, बहुदा, मराठीतील पहिलीच!

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर साठी अभिमानाची गोष्ट म्हणजे मंडळाच्या नाट्यरंग उपक्रमातून चालना मिळालेली ही पहिलीच ‘सबकुछ म.मं.सिं. सभासद’ निर्मिती.

तर सादर करीत आहोत: लॉकडाउनच्या पोळ्या !

स्वप्ना मिराशी आणि गौतम मराठे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली, तुमच्या - आमच्या, कुणाच्याही घरात घडू शकेल, अशी ही कथा. थोडसं हसवत, थोडेसे चिमटे काढत अलगद तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणार आहे, शनिवार सप्टेंबर २६ रोजी सिंगापूरच्या संध्याकाळी ८ वाजता

प्रयोगानंतर लॉकडाउनच्या पोळ्या टीम बरोबर एक चर्चाही आयोजित केलेली आहे. त्यामध्ये ही तुम्हाला सहभागी होता येईल.

पण लक्षात असू द्या, लिंक केवळ नाव नोंदवलेल्या सभासदांनाच मिळेल. प्रेक्षक संख्या मर्यादीत आहे. तेव्हा पटकन नाव नोंदवा. एका घरातून एक रेजिस्ट्रेशन केले तरी बास आहे.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software