• Home
 • साहित्य सहवास कोजागिरी मैफिल - चंद्र आणि चांदणे - कवितावाचन आणि गायन

साहित्य सहवास कोजागिरी मैफिल - चंद्र आणि चांदणे - कवितावाचन आणि गायन

 • 30 Oct 2020
 • 21:00
 • 31 Oct 2020
 • 00:00
 • Online on ZOOM

Registration


Registration is closed


'तोच चंद्रमा नभात' असला आणि दर पौर्णिमेला तो त्याच झळाळीने आपल्याला मोहवत असला तरी कोजागिरीच्या चांदण्याची बात काही औरच. कोजागिरीचा चंद्र आपल्याला रम्य आठवणींमध्ये घेऊन जातो, भावनाप्रधान करून जातो. अशात जर केशरी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून मित्र मैत्रिणींबरोबर कवितांवर गप्पा मारत रात्र जागवता आली, काही सुमधुर गाणी ऐकता आली तर त्या 'शारद सुंदर चंदेरी रात्री'ची मजा द्विगुणित होईल. की नाही?

३० ऑक्टोबरला कोजागिरी उर्फ कौमुदी पौर्णिमा आहे. ती एकत्र अशीच काहीशी साजरी करायला भेटू या ऑनलाइन - एका खास घरगुती मैफिलीत.

तुम्ही "चंद्र" किंवा "चांदणे" यावर आधारित पूर्वप्रकाशित किंवा स्वरचित कविता वाचू शकता. याच विषयावर गाणी सादर करू शकता. किंवा कविता आणि गाण्यांवर गप्पा मारत या साहित्यिक मैफिलीचा आस्वाद घेऊ शकता.

या तिन्हीसाठी नावनोंदणी करणे गरजेचे असेल. तरी ज्यांना कविता किंवा गाणी सादर करायच्या असतील त्यांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावी, तसेच ज्यांना या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभाग घ्यायचा असेल त्यांनीही आपली नावे लवकरात लवकर नोंदवावी.

तर मंडळी, मसाल्याच्या आटीव दुधाबरोबर या वर्षी या साहित्यिक मैफिलीचा आनंद लुटण्यासाठी सहभागी व्हा.

दिनांक: शुक्रवार ३० ऑक्टोबर २०२०
वेळ: रात्रौ ९:०० ते लक्ष्मीचे "को जागरती" ऐकू येईपर्यंत !
विषय: चंद्र व चांदणे 

 • हा कार्यक्रम फक्त मंडळाच्या सभासदांसाठी मर्यादित आहे.
 • प्रत्येक वाचक व गायकाने वेगळे रजिस्टर करणे गरजेचे आहे.
 • श्रोत्यांनी घरटी एक नोंदणी केली तरी पुरे आहे. 
 • एका वाचकाने एकच कविता सादर करावी व त्याचा अवधी ५ मिनिटापेक्षा जास्त नसावा. 
 • गायन लाईव्ह करणे अपेक्षित आहे. त्यासाठी लागणारी सर्व म्युझिक व्यवस्था गायकाने करावी ही विनंती. एका गायकाने एकच गाणे सादर करावे व त्याचा अवधी ५ मिनिटापेक्षा जास्त नसावा.
 • गायनासाठी निवडचाचणी नसेल. नावनोंदणी पुरेशी आहे.
 • कार्यक्रम झूम वर होईल. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. नोंदणी केलेल्यांनाच झूम लिंक देण्यात येईल.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software