नमस्कार मंडळी....
हा हा म्हणता, वर्ष २०२० संपत आले की! किती घटना या वर्षात घडल्या. पुढच्या 'क्षणी' काय होईल इतकी भिती वाटेल असे करोनाचे वादळ आले. त्यात काही मित्र व आप्तेष्ट पोळले गेले. कोणत्या क्षणी, कोणत्या ठिकाणी काय घडले, यावर पुढचं आयुष्य अवलंबून राहीले. अशा वेळी जे वाचले त्यांचा पेला व जे गेले त्यांचा पेला, कोणाचा भरलेला व कोणाचा रिकामा हे कळेनासे झाले. काहीही न लिहिलेले पत्र म्हणजेच कोणी online जरी दिसले तरी हायसे वाटू लागले. एकेक 'क्षण' मोलाचा वाटू लागला. अजूनही त्या वादळाचे वारे पूर्णपणे शमले नाहीत. तरी येणारा प्रत्येक क्षण काळजीपूर्वक जगा.
कोणाचे भरलेले भांडे, तर कोणाचे रिकामे पेले क्षण असते पाखरू, तर पिंजऱ्यात असते ठेवले क्षेम कुशल आप्तेष्टांचे, जरी कार्डावर शब्द न लिहिलेलेवाटचाल करू नववर्षात, मास्क नाका तोंडावर बांधलेले - ( प्रसिद्ध कवी ख.त.निशब्दे यांच्या सौजन्याने, त्यांचे आभार )
आपणां सर्वांना व आपल्या कुटुंबियांना येणाऱ्या नववर्षात आनंद ‘क्षण’ यावे यासाठी अनेक शुभेच्छा !
तारीख: २७ डिसेंबर २०२०, रविवारवेळ : सायंकाळी ४ वा. (ही वेळ सर्वांनी पाळावी अशी आवर्जून विनंती) स्थळ: याही महिन्यात आपण (ZOOM) झूम शब्दगंधच घेऊ
विषय :
सर्वांनी आपली उपस्थिती या मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. ZOOM लिंक नोंदणी केलेल्यांनाच पाठवण्यात येईल याची कृपा नोंद घ्यावी. तुम्हाला काही प्रश्न असल्यास shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699